Nashik News : लाचखोर प्रभारी कार्यालय अधीक्षक जाळ्यात

Bribe crime
Bribe crimeesakal

नाशिक : नाशिक महापालिकेच्या हॉकर्स झोनमध्ये चहाच्या टपरीची बायोमेट्रिक नोंदणी करून देऊन व पावती सुरू करून देण्याच्या मोबदल्यात १८०० रुपयांची लाच स्वीकारताना पश्चिम विभागीय कार्यालयातील जाहिरात व परवाना विभागाचा लिपिक व प्रभारी कार्यालय अधीक्षक राजू उत्तम वाघ व शिपाई प्रवीण अर्जुन इंगळे यांना सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या मुख्य प्रवेशद्वार जवळील पार्किंगमध्ये शिपाई प्रवीण इंगळे याने प्रभारी कार्यालय अधीक्षक असलेल्या राजू वाघ याच्यातर्फे लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. (Bribery in charge office superintendent and clerk arrested bribery department action Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Bribe crime
Crime News : खोट्या अनुभवपत्रामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

महानगरपालिका हॉकर्स झोनमध्ये चहाच्या टपरीची बायोमेट्रिक नोंदणी करून देऊन व पावती सुरू करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाच हजारांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती १८०० रुपये ठरले.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल बागूल, पोलिस नाईक किरण अहिरराव, राजेंद्र गीते, संतोष गांगुर्डे यांनी सापळा रचून कारवाई केली.

Bribe crime
Nashik News: ग्राहक न्याय आयोगाचा महावितरणला दणका! शेतकऱ्यास 6 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com