Nashik Crime News : बनावट क्रमांकाची लक्झरी बस RTOच्या ताब्यात

Bus number (AR-01-T-4124) parked in Bhadrakali police station premises
Bus number (AR-01-T-4124) parked in Bhadrakali police station premisesesakal

Nashik Crime News : केवळ टॅक्स वाचवण्यासाठी एकाच क्रमांकाच्या दोन लक्झरी बस रस्त्यावर धावत होत्या. बुधवारी (ता. ३१) भद्रकाली गुन्हे शोध पथकाने याचा भांडाफोड करत बनावट क्रमांकावर धावणारी बस ताब्यात घेतली होती. (bus running on fake number was seized by RTO nashik crime news)

आरटीओ अधिकाऱ्यांनी त्या बसची पाहणी करत पुढील कारवाईसाठी त्यांच्या ताब्यात घेतली असून, आर्थिक दंडही करण्यात आला आहे. भद्रकाली गुन्हे शोध पथकास (एआर- ०१- टी- ४१२४) एकाच क्रमांकाच्या दोन लक्झरी बस रस्त्यावर धावत आहे. त्यातील एक बस भिलवाडा येथे उभी असून त्याच क्रमांकाची दुसरी बस ३१ मेस शहरात दाखल झाली.

टाकळी रोड तिग्रानिया कंपनी परिसरातील पार्किंगमध्ये उभी असल्याची माहिती मिळाली. पथकाने पार्किंगमधून बस ताब्यात घेतली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत एकाच क्रमांकावर दोन बस धावत असल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत पोलिसांकडून आरटीओ कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bus number (AR-01-T-4124) parked in Bhadrakali police station premises
Nashik Crime : हॉकर्स झोन आखणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

आरटीओ अधिकारी बसची संपूर्ण तपासणी करून बस ताब्यात घेतली. प्राथमिक चौकशीत आरटीओकडून बस मालकास ४७ हजारांचा आर्थिक दंड करण्यात आला आहे. अधिक चौकशीत दंड वाढून अडीच ते तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या तरी दंड भरला नसल्याने आरटीओ अधिकाऱ्यांनी बस ताब्यात घेऊन भद्रकाली पोलिस ठाणे येथे उभी केली आहे. आरटीओ कार्यालयाचा कारवाई संदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यास संबंधित बस बाबत कुठला निर्णय घ्यायचा हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Bus number (AR-01-T-4124) parked in Bhadrakali police station premises
Nashik Crime News : ऐवज हिसकावणाऱ्या भामट्यांचा शहरात धुमाकूळ; एकाच दिवशी 4 घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com