Nashik News: हमी भावानेच कांदा खरेदी करा; शेतकऱ्यांची मागणी, मनमाडला व्यवहार सुरू होताच भावात घसरणीमुळे नाराजी

After the start of onion auction in the market committee at Manmad, there has been a large influx of onions.
After the start of onion auction in the market committee at Manmad, there has been a large influx of onions.esakal

मनमाड : कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद अखेर बिनशर्त मागे घेतल्यामुळे तेरा दिवसांच्या खंडानंतर मनमाड बाजार समितीमध्ये कांदा लिलावाचा आवाज घुमला. लिलाव प्रक्रियेत मोठी लगबग दिसून आली, मात्र आजच्या लिलावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.

लिलाव ठप्पमुळे कांदा चाळीत सडला तर उरलेल्या कांद्याच्या वजनातही घट झाल्याने दुहेरी फटका सोसावा लागल्यामुळे शासनाने कांदा हमी भावात खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Buy onion at guaranteed price Farmers demand displeasure due to fall in prices as soon as Manmad trade starts Nashik News)

व्यापाऱ्यांनी कांदा निर्यातशुल्कावरून बंद पुकारून लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प झाले होते. शासन यंत्रणा आणि व्यापाऱ्यांच्या बैठका निष्फळ ठरल्या होत्या.

कुठलाच तोडगा निघत नव्हता. पालकमंत्री दादा भुसे यांनी काल मध्यस्थी केल्याने व्यापाऱ्यांनी तेरा दिवसापासून सुरू असलेला बंद सशर्त मागे घेतला. मनमाडसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आज लिलावाला सुरुवात झाली.

मात्र या बंदमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये सडून गेलेला आहे. सडलेल्या कांद्याचा मोठा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

लिलाव सुरू झाला असला तरी भाव चांगला मिळाला तर शेतकरी समाधानी होईल अन्यथा कांदा कवडीमोल भावामध्ये विकावा लागला तर शेतकऱ्यांमध्ये रोष दिसून येईल. आज १४ व्या दिवशी कांदा कोंडी फुटल्यानंतर मनमाडमध्ये लिलावाला सुरळीत सुरुवात झाली.

After the start of onion auction in the market committee at Manmad, there has been a large influx of onions.
Nashik Onion Auction: लासलगावला कांद्याला 2050 रुपये सरासरी भाव! बाजार समितीत कांदा लिलाव सुरू

सकाळी कांदा लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी झाल्याने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, कर्मचाऱ्यांची लगबग दिसून आली. ट्रॅक्टर, पिकपसह वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सत्रात २८९ वाहनांची आवक झाली.

कांदा बाजारभाव कमीतकमी ५०२ रुपये जास्तीतजास्त २३५० व सरासरी १९०० रुपये प्रति क्विंटल होते. मात्र लिलाव सुरू होताच पहिल्याच दिवशी मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात क्विटंलमागे सरासरी ३०० ते ४०० रुपयांनी घसरण झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या दिवशी कांदा लिलाव ठप्प झाले त्या दिवशी क्विटंलला २४०० रुपयांचा भाव होता. मात्र तोच भाव आज सरासरी खाली उतरलेला दिसला.

त्यातच लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचा कांदा चाळीत सडला. उरलेल्या कांद्याच्या वजनातही मोठी घट झाल्याने कांदा उत्पादकांना दुहेरी फटका सोसावा लागत आहे. शासनाने कांदा हमी भावात खरेदी करण्याची एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

व्यावसायिक समाधानी....

कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे गेल्या १३ दिवसांपासून उलाढाल थांबली होती. बाजार समितीच्या अर्थकारणावर अवलंबून असलेले छोटे मोठे व्यवसाय ठप्प झाले होते. छोटे वाहनाधरकांनाही काम नव्हते.

त्यामुळे मजुरांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले होते. लिलाव सुरू झाल्याने या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

After the start of onion auction in the market committee at Manmad, there has been a large influx of onions.
Nashik Water Crisis: इगतपुरीत 12 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद! संतप्त नागरिकांचे नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com