Nashik News: चांदोरीकरांचा शासकीय वाळू डेपोला विरोध; दुसऱ्या टप्प्यातील वाळू उपसा पाडला बंद

Villagers protesting the government's ongoing sand sale in the Godavari river.
Villagers protesting the government's ongoing sand sale in the Godavari river.esakal
Updated on

Nashik News : येथे गोदावरी नदीपात्रातून दुसऱ्या टप्प्यात सुरु असलेल्या वाळू उपशाला येथील ग्रामस्थांनी विरोध करीत हे काम बंद पाडले आहे. वाळू उपशामुळे गोदावरी नदीचे पात्र रुंद होत असल्याने ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करीत प्रशासनाला ग्रामपंचायतीतर्फे तसे पत्र देखील देण्यात आला आहे.

राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पहिल्याच शासकीय वाळू विक्री केंद्राचा चांदोरी (ता. निफाड) येथे १३ मे २०२३ ला प्रारंभ झाला होता. (Chandorikar opposition to government sand depot nashik news)

वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी शासनाने स्वतःच सहाशे रुपयांत वाळू पुरविण्याचा धोरणात्मक निर्णय घेत त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली. या प्रक्रियेत ६०० रुपयांत एक ब्रास वाळू वाटपाचा हा निर्णय सामान्यांसाठी सोयीचा असला, तरी चांदोरी ग्रामस्थांनी येथील शासकीय वाळू डेपोला दुसऱ्या टप्प्यात विरोध केला आहे.

या उपशामुळे वाहतूक करताना रस्त्यांची होणारी झीज, दुष्काळसदृश परिस्थिती, गोदावरी नदीचे होणारे खोलीकरण यामुळे भविष्यात परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींचे कमी होणारे पाणी, यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारी जाणून घेत ग्रामपंचायतीतर्फे निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांस शासकीय वाळू डेपो बंद करण्यासंदर्भात पत्र देत विरोधाचे शस्त्र उगारत १० नोव्हेंबर रोजी वाळू उपसा बंद केला.

Villagers protesting the government's ongoing sand sale in the Godavari river.
Farmer Protest: कर्ज वसुलीविरोधात नागपुरात अन्नत्याग आंदोलन; शेतकरी संघटना समन्वय समितीचा आक्रमक पवित्रा

लाखो रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्यांची वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे चाळण होवू लागली आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदी पात्रात माती ढासळत असून लगतच्या शेतजमिनीचे नुकसान होत असून गोदावरी नदीचे पात्र रुंदावले गेले आहे.

"वाळू उपशामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असून नदीचे पात्र रुंद होत आहे. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत डेपो बंद करण्याचे पत्र तहसीलदार यांना दिले आहे." - विनायक खरात, सरपंच चांदोरी

"शासनाच्या आदेशानुसार पूर प्रवण क्षेत्राच्या नदीपात्र खोलीकरण करत पुराला अटकाव करण्यासंदर्भात हा उपक्रम आहे. सर्वसामान्यांना ६०० रुपये ब्रास तर घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येत आहे. लवकरच प्रशासनाच्यावतीने चांदोरी ग्रामस्थांची भूमिका समजावून घेत मार्ग काढला जाईल." - शरद घोरपडे, तहसीलदार निफाड

Villagers protesting the government's ongoing sand sale in the Godavari river.
Nashik News: जलजीवन, बांधकामचे तीन दिवसांत 50 कोटींची बिले अदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com