esakal | "ठाकरे कुटुंब स्वत:साठी काही घेत नव्हते..पण आता सगळंच घेताएत" -  चंद्रकांत पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil.jpeg

आमचे सरकार असताना आम्ही रश्मी ठाकरे यांना 'सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्षपद घ्या' म्हणून आग्रह धरला होता. यावेळी मी उद्धव ठाकरे यांना स्वत: बोललो होतो. पण, त्यावेळी ठाकरे कुटुंब स्वत: साठी काही घेत नाही, असं मला तेव्हा सांगण्यात आलं. पण, ठाकरे आता सगळंच घेत आहेत, असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

"ठाकरे कुटुंब स्वत:साठी काही घेत नव्हते..पण आता सगळंच घेताएत" -  चंद्रकांत पाटील 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोणताही अनुभव नसतांना मुलाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं आहे. आता रश्मी ठाकरे यांना 'सामना'चे संपादकपद दिले असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे कुटुंबियांना टोला लगावला. पण वहिनी सामनाचे संपादक पद खूप चांगलं भूषवतील, असे सांगत कौतुकही केले. महिलेला संपादकपद मिळाले, याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. आमचे सरकार असताना आम्ही रश्मी ठाकरे यांना 'सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्षपद घ्या' म्हणून आग्रह धरला होता. यावेळी मी उद्धव ठाकरे यांना स्वत: बोललो होतो. पण, त्यावेळी ठाकरे कुटुंब स्वत: साठी काही घेत नाही, असं मला तेव्हा सांगण्यात आलं. पण, ठाकरे आता सगळंच घेत आहेत, असेही ते म्हणाले.

"राऊत नाराज आहे हे मनाचे खेळ​" - पाटील

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व वेळ कार्यकर्ते स्व. कैलास आव्हाड यांच्या श्रध्दांजली सभेसाठी ते आले होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी कोअर कमिटीबरोबर चर्चा केल्यानंतर माध्यमाशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत हे नाराज असल्याचा प्रश्नावरही ते बोलले. ते म्हणाले,'राऊत नाराज आहे हे मनाचे खेळ आहेत. गेल्या तीन-चार महिन्यात आपण हे बघितले की, त्यांची नाराजी सायंकाळी दूर होते. सत्तेचा फेव्हिकॉल पक्का असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

"मुख्यमंत्र्यांची कर्जमाफी ही फसवी" - पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी सातबारा कोरा करायचा, शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे सांगत होते. पण, प्रत्यक्षात केलेली कर्ज माफी ही फसवी आहे. अवेळी पावसाने ९४ लाख हेक्टर पीकाचे नुकसान झाले. त्यामुळे नागपूर अधिवेशान आम्ही सहा दिवस हा विषय लावून धरला. शेवटच्या दिवशी कर्जमाफीची घोषणा केली. पण, ती सगळी फसवीच ठरली.

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!

loading image