Controversial Case : भुजबळ फार्मवर पोलिस बंदोबस्तात वाढ; पोलिस यंत्रणा सतर्क

chhagan bhujbal news
chhagan bhujbal newsesakal

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर सिडकोतील भुजबळ फार्म येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येऊन पेट्रोलिंगही वाढविण्यात आली आहे. (chhagan bhujbal controversial statement about devi saraswati Increased police presence at Bhujbal Farm nashik Latest Marathi News)

chhagan bhujbal news
PFIच्या मालेगातील आणखी 2 कार्यकर्त्यांना अटक

मुंबई येथे एका कार्यक्रमादरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये थोर महापुरुषांच्या फोटोऐवजी सरस्वती देवीचे फोटो लावण्यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित करीत वादग्रस्त विधान केले. या वादग्रस्त विधानासंदर्भात राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच, भुजबळ यांचा निषेध केला जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर माजी मंत्री भुजबळ यांचे निवासस्थान असलेले सिडकोतील भुजबळ फार्म येथे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, पेट्रोलिंगही वाढविण्यात आली आहे. अंबड पोलिस ठाण्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडूनही याबाबत सतर्कता बाळगली जात आहे.

"भुजबळ फार्म येथे नेहमीपेक्षा पोलिस कर्मचारी वाढविण्यात आले आहेत. तसेच, पेट्रोलिंगही वाढविली आहे. पोलिस सतर्क आहेत." - भगीरथ देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड.

chhagan bhujbal news
दसऱ्याच्या दिवशी गांधीनगरला 53 फुटी रावण दहन; यंदाचे 67 वे वर्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com