कारागृहातील बंदीवानांच्या सृजनशीलतेला मिळाले व्यासपीठ : भुजबळ

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal

नाशिक : मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी आपली कला व सृजनशीलतेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तू सर्वसामान्यांकरीता उपलब्ध होण्यासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहाअंतर्गत प्रगती विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंना सणोत्सवांच्या निमित्ताने व्यासपीठ मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितली नाशिक मध्यवर्ती कारागृहाची ऐतिहासिक ओळख.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितली नाशिक मध्यवर्ती कारागृहाची ऐतिहासिक ओळख.esakal

भुजबळांनी सांगितली नाशिक कारागृहाची ऐतिहासिक ओळख

नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या प्रगती विक्री केंद्रात दिवाळी मेळाव्यानिमित्त बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, 1927 साली या कारागृहाची निर्मीती झाली असल्याने अनेक नामवंत स्वातंत्र्य योद्धे तसेच साने गुरूजी हे या कारागृहात वास्तव्यास असल्याने या कारागृहास ऐतिहासिक ओळख आहे. कोणतीही व्यक्तिही जन्मत: गुन्हेगार नसते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे अथवा परिस्थितीमुळे बंदिवान व्हावे लागते. अशा परिस्थितीत बंदिवानांना सुधारण्यासाठी संधी मिळावी या हेतूने शासन व कारागृह प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असतो.

Chhagan Bhujbal
अपयशाची चव चाखलेल्या स्वप्नीलने केली यशाची हॅट्रिक!
नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या प्रगती विक्री केंद्रात दिवाळी मेळाव्यानिमित्त बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्रातील वस्तू बघताना पालकमंत्री भुजबळ.
नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या प्रगती विक्री केंद्रात दिवाळी मेळाव्यानिमित्त बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केंद्रातील वस्तू बघताना पालकमंत्री भुजबळ.esakal

बंदिवानांच्या उत्पादनांची जाहिरात होणे गरजेचे

बंदिवानांच्या कलागुणंना वाव मिळावा यासाठी कारागृहात विणकाम, सुतारकाम, लोहारकाम, चर्मकाम, धोबीकाम, मुर्ती बनविणे व बेकरी उत्पादने अशी विविध कामे करण्यात येतात. यातून तयार करण्यात आलेल्या वस्तू, पदार्थ हे सणोत्सवांच्या काळात विक्रीसाठी उपलब्ध केली जातात. बंदिवानांनी बनविलेल्या या उत्पादनांची जाहिरात होणे गरजेचे आहे. ज्यामुळे बंदिवानांचे सुधारणा व पुनर्वसन होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कारागृहातील सोयी सुविधांसाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.

भुजबळ यांनी प्रदर्शनाची पाहणी करताना वस्तूंची माहीती देखील जाणून घेतली.
भुजबळ यांनी प्रदर्शनाची पाहणी करताना वस्तूंची माहीती देखील जाणून घेतली.esakal

पालकमंत्र्यांनी खरेदी केली बंदीवानांच्या हातची चादर

कोरोनाच्या काळात कारागृहातील बंद्यांची विशेष काळजी घेण्यात आली असल्याने या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. त्यासाठी कारागृह प्रशासनाचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. दिवाळी मेळाव्या निमित्त प्रदर्शन व विक्री केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते फित कापून व दिप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी प्रदर्शनाची पाहणी करून बंदीवानांनी तयार केलेली चादर खरेदी केली. कारागृहात सुरू असणाऱ्या उपक्रमांची माहिती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितली.

Chhagan Bhujbal
वनविभागाच्या जमिनीवरच होतेय गांजाची शेती; पोलिस अ‍ॅक्शन मोडवर
छगन भुजबळ यांनी प्रदर्शनाची पाहणी करून बंदीवानांनी तयार केलेली चादर खरेदी केली.
छगन भुजबळ यांनी प्रदर्शनाची पाहणी करून बंदीवानांनी तयार केलेली चादर खरेदी केली.esakal

या कार्यक्रमासाठी मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, सीआयएसएफचे कमांडंट के के भारद्वाज, पोलिस उपायुक्त विजय खरात, उप पोलिस अधीक्षक श्यामकुमार निपुंगे, जिजाऊ बिग्रेड महिला अत्याचार समितीच्या अध्यक्ष चारूशिला देशमुख यांच्यासह कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com