"कोणी चाणक्यबिणक्य महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही!" 

CHHAGAN BHUJBAL.jpg
CHHAGAN BHUJBAL.jpg

येवला (जि.नाशिक) : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षांचे सरकार मजबुतीने उभे आहे. कोणी चाणक्यबिणक्य महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करूनसुद्धा काही झाले नसल्याची प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. रविवारी (ता. ७) येवला मतदारसंघात आलेल्या भुजबळ यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर प्रतिक्रिया देताना आपली भूमिका व्यक्त केली. 

वर्षभर प्रयत्न करूनसुद्धा सरकार मजबूतच असल्याचा भुजबळांचा दावा 
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनविण्यासाठी शिडीची गरज भासणार नसल्याच्या वक्तव्याचा समाचार घेताना अगोदर सरकार पाडून तर दाखवा, मग शिडी लावायची की शिर्डी बॉम लावायचा हे नंतर ठरवा, असा टोला मारला. आज कोकणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा होत असून, त्यापूर्वी खासदार नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल, अशी प्रतिक्रिया देत भाजपचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू झाले, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावर भुजबळांनी कोणी चाणक्यबिणक्य महाराष्ट्रातील भूमीत चालणार नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले आहे. ज्या वेळी जनता सरकारला स्वीकारते तेव्हा कोणी हात लावू शकत नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. 

जेवढे अडचणीत येईल तेवढे बघायला अदानी आणि अंबानी आहेच
ज्येष्ठ नेते शरद पवार अदानी यांना जाऊन भेटले याविषयी विचारले असता, पवारसाहेबांना सगळेच लोक भेटत असतात. त्यामुळे अदानी पवारांना भेटल्यामुळे वीजबिल माफी रद्द झाली, खरे तर फडणवीसांच्या काळातील वीज थकबाकी ही ५० हजार कोटींच्या घरात आहे. जर वीजबिल भरले नाही तर वीज वितरण कंपनी बुडल्याशिवाय राहणार नाही आणि बाकीच्या लोकांना हे हवे आहे. जेवढे अडचणीत येईल तेवढे बघायला अदानी आणि अंबानी आहेच, असा टोला भुजबळ यांनी लगावला. दरम्यान, ओबीसी मोर्चाबद्दल विचारले असता, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे यांनी २७ तारखेच्या मोर्चाचे आमंत्रण दिले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com