नाशिक- गंगापूर रोडवरील संत कबीरनगरमध्ये पाटणकर-सय्यद यांच्या टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून गेल्या दोन महिन्यांत दोघांचा खून झाला आहे. गेल्या महिन्यात सराईत गुन्हेगार अरुण बंडी याचा खून करणाऱ्या करण चौरे यास सोमवारी (ता. २८) कामटवाड्यात बंडीच्या मित्रांनी दगडाने ठेचून मारले. चार दिवसांपूर्वीच मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून चौरेचा खून केल्याची कबुली तिघा संशयितांनी दिली.