esakal | मालेगाव पूर्व भागात लसीकरणासाठी उदासीनता; आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine
मालेगाव पूर्व भागात लसीकरणासाठी उदासीनता; आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान
sakal_logo
By
राजेंद्र दिघे

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : सर्वत्र लसीकरण मोहीम सुरू असून ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात लसीकरण मोहीम धिम्या गतीने होत आहे. मालेगाव शहरातील पूर्व भागात मुस्लिम बांधवांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शहरातील लसीकरण मोहिमेत उदासीनता हे आरोग्य यंत्रणेसमोरचे आव्हान आहे.

पहिल्या लाटेत कोरोनाची सुरवात मालेगाव शहरातून झाली. विविध उपाययोजना करून कोरोनातून लवकर सावरले. त्यानंतरच्या काळातील बेफिकीर, विविध कार्यक्रमांमुळे पुन्हा उसळी घेतली. महापालिका प्रशासनाने गतवर्षीच्या काळात बाधितांच्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. सध्याच्या दुसऱ्या लाटेत प्रतिबंधित क्षेत्राटा दिखावा करण्यात येत आहे.

शहरात सोयगाव, कॅम्प, निमा, वाडिया व आरोग्याधिकारी कार्यालय अशा पाच ठिकाणी मोफत लसीकरण केले जात आहे. पाचही केंद्रांवर लसीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शहराच्या पश्‍चिम भागातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव, नववसाहत, कलेक्टरपट्टा या भागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने केंद्रावर जाऊन लस घेत आहेत. पश्‍चिम भागातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक लसीकरणाला फारसे उत्सुक दिसत नाहीत. रमजाननंतर प्रतिसाद वाढेल असेही नागरिकांनी सांगितले. शुक्रवारी (ता.२३) महापालिकेच्या सतरा व खाजगी पाच केंद्रावर १९,६८९ नागरिकांनी पहिला डोस तर ४,७७१ नागरिकांसह कर्मचारी यांनी लसीकरण करवून घेतल्याचे महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई

लसीकरण दृष्टीक्षेपात-

आरोग्य कर्मचारी पहिला डोस - २५१०

दूसरा डोस- १५४८

सरकारी कर्मचारी पहिला डोस - २१७२

दूसरा डोस- १२०१

४५ वर्षावरील नागरिक पहिला डोस -७२३६

दूसरा डोस- ५८४

६० वर्षावरील नागरिक पहिला डोस - ७७७१

दूसरा डोस- १४३८

एकूण लसीकरण पहिला डोस - १९६८९

दूसरा डोस- ४७७१

हेही वाचा: शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं

लसीकरणाबाबत गृहभेटी देऊन आरोग्य कर्मचारी जागृती करत आहेत. प्रतिसाद खूप कमी मिळत आहे. स्थानिक नगरसेवक, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था यांनी नागरिकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

- डॉ सपना ठाकरे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका मालेगाव

सध्या रमजानचा काळ असल्याने उपवासाचे दिवसामुळे लस घेण्यास दिरंगाई होत आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती बघता भविष्यासाठी लसीकरण सर्वोत्तम पर्याय आहे. नकारात्मक मानसिकता बदलून सर्वांनी लस घेण्यासाठी पुढे यावे.

- सलिम गाझियानी, माजी अध्यक्ष, रोटरी क्लब मिडटाउन