हजार रुपयांसाठी अडून बसला सर्पमित्र; ‘कोब्रा’ अडकविला दारावर

cobra
cobraesakal

नाशिक : केवळ हजार रुपयांसाठी एक सर्पमित्र चक्क अडून बसला. आणि बिल्डींगमध्ये निघालेला नाग चक्क घराच्या दारावर अडकवला... यानंतर रहिवाश्यांमध्ये भितीचे वातावारण निर्माण झाले होते. काय घडले नेमके?

अत्यंत विषारी कोब्रा अडकविला दारावर...

नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात ही घटना घडली. इथल्या एका अपार्टमेंटमध्ये नागरिकांना पार्किंगमध्ये साप दिसला होता. यानंतर रहिवाश्यांमध्ये सापाची दहशत निर्माण झाली होती. यानंतर इंटरेनटवरून सर्पमित्राचा नंबर शोधून त्याला फोन करून साप पकडायला बोलावले. सर्पमित्राने सापही पकडला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, इथून पुढेच त्यांची भीतीनी गाळण उडाली. कारण सर्पमित्राने पकडलेला नाग हा अत्यंत विषारी असा कोब्रा होता. त्याने हा साप पकडण्याचे एक हजार रुपये मागितले. नागरिकांनी दोन-चारशे रुपये देऊ असे सांगितले. मात्र, इतके कमी पैसे घ्यायला सर्पमित्र तयार होईना. आणि अपार्टमेंटमधील नागरिकांनी एक हजार रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे सर्पमित्राचा संताप अनावर झाला. त्याने चक्क पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या दाराला पकडलेला भयंकर विषारी कोब्रा अडकावला आणि तेथून पोबारा केला. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये पुन्हा खळबळ माजली.

cobra
धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडेंना NCB मध्ये मुदतवाढ

अन् रहिवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला....

त्यानंतर दारावर अडकवलेला हा साप दुसरीकडे निसटला, कुणाच्या घरात शिरला तर कसे होणार? असा प्रश्न पडला. शेवटी नागरिकांनी दुसऱ्या सर्पमित्राचा नंबर मिळवला. त्यांना संपर्क साधला. यात संध्याकाळ झाली. त्यानंतर दोन सर्पमित्र आले आणि त्यांनी तो कोब्रा पकडून नेला. झाल्या प्रकाराने नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संताप आहे. सर्प पकडण्याच्या नावाखाली अनेकजण पैसे उकळत आहेत. पैसे नाही दिले, तर असे भयंकर प्रकार करत आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

cobra
आला दसरा, महागणार सोने! खरेदीसाठी 'ही' योग्य वेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com