Nashik News : दिवाळीनिमित्त महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; खड्डे बुजविण्याबरोबरच स्वच्छतेच्या आयुक्तांच्या सूचना

Dr. Ashok Karanjkar
Dr. Ashok Karanjkaresakal

Nashik News : दीपावली सणाच्या निमित्ताने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभागप्रमुखांची सोमवारी (ता.३०) बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. बाजारपेठेतील रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवून रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश त्यांनी दिले. (Commissioner instruction of Sanitation along with plugging of potholes nashik news)

दिवाळीनिमित्त अतिक्रमण, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्तांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. बांधकाम विभागाने सहा विभागातील मुख्य रस्त्यांवर व चौकातील खड्डे तातडीने बुजवावेत व बाजारपेठांमधील वाहतुकीच्या दृष्टीने रस्ते सुस्थितीत राहतील, याची दक्षता घ्यावी.

अतिक्रमण विभागांनी मुख्य रस्ते चौक, बाजारपेठांमधील रस्त्यांवरील अतिक्रमणे नियमित हटविण्याची कारवाई करावी. पुरवठा विभागाने शहरात पाणीपुरवठा विस्कळित होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. विद्युत विभागाने रस्त्यांवरील सर्व पथदीप सुरू राहतील, या दृष्टीने नियोजन करावे.

Dr. Ashok Karanjkar
Dada Bhuse News: दादा येतात, बैठका घेतात..परिस्थिती मात्र ‘जैसे थे’; शिंदे सेनेच्या मार्केटिंगचा फंडा निष्फळ

तसेच वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीच्या संपर्कात राहावे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरांमध्ये नियमित साफसफाई करून रोजचा कचरा उचलला जाईल, असे नियोजन करावे. कार्यालयातील तक्रार निवारण केंद्र संपर्काचे दूरध्वनी नियमित सुरू ठेवावे. तसेच, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

बाजारपेठेत दोनदा स्वच्छता

दीपावलीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात व व्यवहारदेखील मोठ्या प्रमाणात होतात. त्याअनुषंगाने कचरादेखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने बाजारपेठेमध्ये दोनदा साफसफाई होईल, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिल्या. गर्दीच्या ठिकाणी विभागीय स्वच्छता निरीक्षक तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.

Dr. Ashok Karanjkar
Nashik News: काम करू की नियम पाळू..! पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक नियमांमुळे बांधकामक्षेत्राची अडचण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com