esakal | पिंपळगावला आठ दिवसांत ऑक्सिजन प्लांट - आमदार दिलीप बनकर
sakal

बोलून बातमी शोधा

construction of oxygen plant in Pimpalgaon will start in eight days

पिंपळगावला आठ दिवसांत ऑक्सिजन प्लांट - आमदार दिलीप बनकर

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : शासन मान्यतेनुसार एक कोटींच्या आमदार निधीतून कोविड रुग्णांसाठी सोई-सुविधा उपलब्ध केल्या जातील. पिंपळगावला ९० लाख रुपये किमतीचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असून, येत्या ८ दिवसांत त्याचे काम सुरु होईल, असे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर यांनी केले.

निफाड उपजिल्हा रुग्णालयात ६० बेडच्या कोविड रुग्णालयाचे उद्‌घाटन आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. वैनतेय विद्यालयात कोरोना लसीकरण केंद्राचे उद्‌घाटनही करण्यात आले. बनकर म्हणाले, नगरपंचायत प्रशासनाने निफाड शहराची जबाबदारी घ्यावी. पोलिस प्रशासनाने लोकांना समजावून सांगा नसेलच ऐकत तर कायद्याचा वापर करा पण, नागरीकांना विनाकारण रस्त्यावर आले नाही पाहिजे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन मोरे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. राजकारण वेळ येईल तेव्हा करु, पण आता कार्यकर्ते आणि नेत्यांनी झोकून देऊन काम करण्याची वेळ आहे, असे जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिकमध्ये गंभीर प्रकार! मृत कोरोना महिलेचे हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला

काळाबाजार खपवून घेणार नाही : बनकर

पिंपळगाव, लासलगाव आणि आता निफाड येथील सेंटर मिळून २०० शासकीय ऑक्सिजन बेड असलेला निफाड हा एकमेव तालुका आहे. लवकरच ८ ते १० दिवसांत आम्ही भिमाशंकर शाळेच्या माध्यमातून ६० बेडचे अद्ययावत कोविड रुग्णालय युद्धपातळीवर उभारणार आहोत. ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेमडेसिव्हिरचा काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा बनकर यांनी दिला.

याप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, ग्रामविकास अधिकारी संदीप कराड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, डॉ. चेतन काळे, पंढरीनाथ थोरे, सुभाष कराड, सागर कुंदे, मधुकर शेलार, राजेंद्र बोरगुडे, सुनीता राजोळे, बापूसाहेब कुंदे, सुरेश कमानकार, राजेंद्र कुटे, इरफान सैय्यद, जावेद शेख, उन्मेश डुंबरे, रावसाहेब गोळे, महेश कुटे, महेश चोरडिया, बाळासाहेब रंधवे, सुनील निकाळे, बाळासाहेब कापसे, बापू कापसे, सचिन खडताळे आदी उपस्थित होते. कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मधुकर शेलार यांनी आभार मानले.

हेही वाचा: नाशिकमध्ये मृतांच्या आकड्यांचा खेळ; 15 दिवसांत 2 हजारांहून अधिक दहन