esakal | "राम कदमांनी कंगना राणावताला स्वतःच्या आईची उपमा द्यावी" नाशिकमध्ये झळकताएत वादग्रस्त पोस्टर
sakal

बोलून बातमी शोधा

posters 1.jpg

मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणाऱ्या चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिस झाशीची राणीची उपमा देण्यापेक्षा भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी कंगना राणावताला स्वतःच्या आईची उपमा द्यावी असे खळबळजनक विधान असलेले पोस्टर सध्या सिडकोसह नाशिक शहरात झळकत असल्याने भविष्यात भाजप विरोधात शिवसेना असे पोस्टर युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

"राम कदमांनी कंगना राणावताला स्वतःच्या आईची उपमा द्यावी" नाशिकमध्ये झळकताएत वादग्रस्त पोस्टर

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणाऱ्या चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिस झाशीची राणीची उपमा देण्यापेक्षा भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी कंगना राणावताला स्वतःच्या आईची उपमा द्यावी असे खळबळजनक विधान असलेले पोस्टर सध्या सिडकोसह नाशिक शहरात झळकत  असल्याने भविष्यात भाजप विरोधात शिवसेना असे पोस्टर युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

या पोस्टवरील वादग्रस्त लिखाण पुढील प्रमाणे आहे.

सत्तेच्या लालासापायी आपण काय करतो हे सामान्य नागरिकांना चांगलेच कळते आहे. संपूर्ण देशात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळवणे. त्यापासून जनतेला वाचवणे. यासाठी पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री आपापल्या परीने मुकाबला करीत आहे. म्हणून पंतप्रधानांनी पीएम फंडांमध्ये व राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी सीएम फंडामध्ये यथा शक्ती आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन केले होते.

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

राजकारणाच्या स्वार्थापोटी काय घडले असे सांगत पुढील मुद्द्यांचा पॉटर'मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार व लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र राज्याकडून मिळणारे मानधन हे मुख्यमंत्री फंडात न देता त्यांनी पंतप्रधान फंडामध्ये निधी वर्ग केला. त्यामुळे अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्र मध्ये कोरोना संदर्भात प्रश्न विचारण्याचा आहे का ?  महाराष्‍ट्रामध्‍ये कोरोना चा फहिलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रत्येक धर्मियांचे प्रार्थना स्थळे बंद आहेत. असे असताना भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते मंदिर उघडे करावी यासाठी घंटा नाद करीत आहे. (जनतेचे समर्थन नसताना).  देशामधील प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरामध्ये देव्हारा असतो व तो रोज सकाळी अंघोळ झाल्यावर देवाची पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. त्यामुळे ज्यांच्या घरात देव्हारा नाही, त्यांनी घंटानाद आंदोलन केले असे म्हटले आहे.


महाराष्ट्र पोलिसांचा केवळ अपमान करून मुंबईपेक्षा मला पाकव्याप्त काश्मीर बरा असे राष्ट्रद्रोही विचार करणाऱ्या कंगना राणावत बद्दल भाजपा प्रवक्ता राम कदम कंगना राणावत ही झाशीची राणी आहे असे वक्तव्य भाजप प्रवक्ते राम कदम करत राष्ट्रद्रोही कंगना राणावत हिला झाशीची राणी संबोधून झाशीची राणी चा अपमान करण्यापेक्षा तिला कदम यांनी स्वतःच्या आईची उपमा द्यावी वादग्रस्त विधान या बॅनरवर करण्यात आले आहे.त्यामुळे संपुर्ण शहरवासीयांची या बॅनरकडे लक्ष वेधले जात आहे आता यावर भारतीय जनता पक्ष काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बॅनरखाली शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेविका हर्षा बडगुजर, युवा नेते दीपक बडगुजर, विभाग प्रमुख पवन मटाले, माजी विभागप्रमुख अतुल लांडगे यांचे फोटो आहेत.

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप\

संपादन - ज्योती देवरे

loading image