"नको ते परदेश दौरे..अन् नको ती टुर...' 

Sri-Lanka-tourism-.jpg
Sri-Lanka-tourism-.jpg

नाशिक : कोरोना विषाणूचा धोका आणि त्याची चर्चा वेगाने पसरत आहे. तेवढ्याच वेगाने नागरिक स्वतः त्याबाबत सजग झाल्याचे दिसत आहे. मंदिरात दर्शनापासून, तर प्रवासापर्यंत "कोरोना'पासून बचावासाठी सगळेच जागरूक झाले आहेत. त्याचा मोठा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. उन्हाळ्याच्या सहलींचे नियोजन सुरू असण्याच्या या हंगामात नागरिकांमध्ये मात्र नको युरोप अन्‌ नको ती उन्हाळ्याची टुर, त्यापेक्षा यंदा आपले घरच बरे, अशी भावना दिसून येत आहे. 

..त्यामुळे टुर्स आयोजक संस्थाही मंदीत
कोरोनाच्या भीतीमुळे एकूणच पर्यटन व्यवसायावर पन्नास ते साठ टक्के परिणाम झाला आहे. अनेकांनी सहलीचे बेत रद्द केले आहेत. त्यामुळे टुर्स आयोजक संस्थाही मंदीत आहेत. जगभरातील पर्यटनासह नाशिकच्या पर्यटनावरही हा परिणाम जाणवतोय. विदेशी पर्यटकांसह अन्य राज्यांतील पर्यटकदेखील पर्यटनाकडे पाठ फिरवत आहेत. दर वर्षी हौशी पर्यटक एप्रिल- मेमध्ये देशांतर्गत तसेच, परदेशी विशेषतः युरोपला सहलीसाठी जातात. यंदा मात्र नाशिकसह राज्यभरातील पर्यटकांनी युरोपसह एकूणच परदेशवारी टाळली असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. उन्हाळ्यात जगभरातील पर्यटक सुटीचा आनंद लुटण्यासाठी सहली काढतात. दर वर्षी हजारो पर्यटक भारत भ्रमंती करतात. त्यातून हॉटेल, दळणवळण, लॉजिंग, छोटे-मोठे व्यावसायिक व दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची आयात-निर्यात होते. यंदा मात्र या सर्वांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. 

यंदाच्या हंगामात... 
* नाशिकच्या पर्यटनात 50 टक्के घट 
* हॉटेल, लॉजिंग व्यवसायात मंदी 
* वाहतूक व्यवसायावर नकारात्मक परिणाम 
* देशांतर्गत पर्यटन वाढले, विदेशी सहलींत घट 
* वायनरीवर परिणाम 
* मार्चमधील सहली रद्द करण्याकडे कल 
* एप्रिलमधील सहली मात्र फुल 
 
देशांतर्गत पर्यटनाकडे ओढा 
आत्तापर्यंत 57 देशांत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पर्यटनावरही मोठा परिणाम झाला. सिंगापूर, थायलंड, मलेशिया, हॉंगकॉंग, मकाऊ, युरोप, मॉरिशियस येथील पर्यटनाकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. देशांतर्गत पर्यटन वाढले असून, पर्यटकांचा ओढा काश्‍मीर, सिक्कीम, दार्जिलिंग, नैनिताल, शिमला, कुलू मनाली, श्रीलंका, मालदिव, भूतान, उत्तरांचल, चारधाम, आसाम, मेघालय येथील पर्यटनाकडे वाढला आहे. 

नाशिकच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम 
पर्यटकांनी घाबरून न जाता पर्यटनाचा आनंद घ्यावा. देशांतर्गत पर्यटनाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मार्चमधील अनेक बुकिंग रद्द करण्यात आले असले, तरी एप्रिल- मेमधील पर्यटनात वाढ होत आहे. 
-संदीप मोरे, गिरिकंद टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स 

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...

देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, पर्यटकांचा ओढा भारतातील थंड हवेच्या ठिकाणांकडे वाढला आहे. परदेशवारीचे प्रमाण घटले असले, तरी पर्यटक देशांतर्गत पर्यटनाकडे वळले आहेत. -दत्ता भालेराव, पर्यटन व्यावसायिक 

कोरोना विषाणूमुळे आंतराष्ट्रीय पर्यटनावर 15 ते 17 टक्के फरक पडला आहे; पण आंतरराज्य पर्यटन वाढले आहे. आसाम, मेघालय, सेव्हन सिस्टर्स, राजस्थान, सिक्कीम, दार्जिलिंग, हिमाचल प्रदेश याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. -राजेंद्र बकरे, अध्यक्ष ट्रॅव्हल असोसिएशन  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com