ही कसली परीक्षा! जीव गमावलेल्यांच्या कुटुंबाच्या नशिबी भयंकर परवड; मन विषण्ण करणारी आपबिती 

corona dead bodies.jpg
corona dead bodies.jpg

नाशिक : मृत्यूनंतर माणसाची ओळख केवळ बॉडी असते, अशा स्वरूपाचा आयुष्याची क्षणभंगुरता स्पष्ट करणारा व्हॉट्सॲप मेसेज अनेकांनी वाचला असेल. त्यापेक्षाही अस्वस्थ व विषण्ण करणारी बाब शुक्रवारी (ता. २८) नाशिक शहरात समोर आली.

माणूस नाही तर त्या क्रमांकाच्या बॉडीचा नंबर कधी लागणार?

कोरोना विषाणूच्या संसर्गाला बळी पडलेल्या मृतांची ओळख केवळ आकड्याने स्पष्ट होते. मृतदेहांचे दहन करणारी गॅसदाहिनी नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून अनेक मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असताना, सिडकोमधील ५५ क्रमांकाच्या किंवा नाशिक रोडचा ६४ क्रमांकाचा मृतदेहाचा नंबर कधी लागणार, याची दिवसभर चर्चा होती. 

जीव गमावलेल्यांच्या नशिबी भयंकर परवड
कोरोना महामारीमुळे केवळ सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचीच दुर्दशा चव्हाट्यावर आली असे नाही. या विषाणू संसर्गामुळे जीव गमावलेल्यांच्या नशिबी भयंकर परवड मृत्यूनंतरही आली आहे. कोरोनाबळींवर विद्युत किंवा गॅसदाहिनींमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. तथापि, नाशिक शहरात एकच विद्युतदाहिनी असल्याने, तसेच एक गॅसदाहिनी बंद पडल्याने शुक्रवारी एका क्षणी तब्बल ७२ मृतदेह दहनाविना पडून असल्याची स्थिती होती. त्यामुळे सुरक्षित अंतर व अन्य गोष्टींची काळजी घेऊन लाकडाच्या सरणावर दहनसंस्काराची परवानगी देण्याची वेळ महापालिकेवर आली. सायंकाळी उशिरा गॅसदाहिनीचा बिघाड दूर करण्यात यश आले. नंतर केवळ ३५ मृतदेह दहनाच्या प्रतीक्षेत असल्याचे महापालिकेकडून रात्री उशिरा सांगण्यात आले. तथापि, अशा अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या मृतदेहांच्या आकडेवारीबद्दल घोळ असल्याचे दिसून आले. 


महापालिका म्हणते, ३५ शिल्लक 
महापालिकेच्या सूत्रांचे मात्र ३५ मृतदेह वेटिंगवर असल्याचे म्हणणे आहे. त्यात गुरुवारचे १२ मृतदेह शिल्लक असून, शुक्रवारी नव्याने विविध खासगी रुग्णालयांनी २३ मृतदेहांची नोंदणी केली. त्यामुळे वेटिंगवरील संख्या ३५ झाली आहे. 


ही कसली परीक्षा... 
कोरोनाच्या मृत्यूच्या धक्क्याने कुटुंब पूर्णता हादरलेले... घरात आक्रोश सुरू असतो. दुसरीकडे घरातील कर्त्यांना नातेवाईक गेल्याचे दुःख बाजूला ठेवून नंबर कधी लागणार याची चिंता करीत प्रतीक्षा करावी लागते. हे सगळे प्रचंड वेदनादायी असते. त्यामुळे कुटुंबाची परीक्षा न पाहता, विभागनिहाय सुरक्षित अंतर ठेवून काळजी घेऊन अंत्यसंस्काराची परवानगी दिली पाहिजे. -दिनकर आढाव, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप  

संपादन - ज्योती देवरे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com