Corona update : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार ७०७ पार; मात्र बरे होणाऱ्यांचे वाढतंय प्रमाण

coronavirus_gen_jpg.jpg
coronavirus_gen_jpg.jpg

नाशिक : जिल्‍हाभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. बुधवारी (ता. ५) दिवसभरात ५८१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १७ हजार ७०७ वर पोचली आहे.

कोरोनाबळींची संख्या ५४७ वर

दिवसभरात ५२८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या १२ हजार ८१२ पोचली आहे. बुधवारी दोन रुग्‍णांच्‍या मृत्‍यूमुळे कोरोनाबळींची संख्या ५४७ वर पोचली आहे. जिल्ह्यात दिवसभरात आढळलेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ४१९, ग्रामीण भागातील १११ आणि एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. बरे झालेल्‍या ५२८ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ३५०, ग्रामीण भागातील १७५ आणि मालेगावच्‍या तीन रुग्‍णांचा समावेश आहे. तर शहरातील ७१ वर्षीय रुग्ण व जेल रोडच्‍या ६७ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात नाशिक शहरात ७२९ संशयितांसह ग्रामीण भागातील २०३, मालेगावला ३६, तर गृहविलगीकरणातील १०७ असे एकूण एक हजार ७५ संशयित आढळून आले. सायंकाळी उशिरापर्यंत तब्‍बल एक हजार ३२१ अहवाल प्रलंबित होते.

मालेगावमध्ये पुन्हा उद्रेक

मालेगाव : शहरात बुधवारी तब्बल महिन्यानंतर प्रथमच ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहर व परिसरात कोराेनाचा उद्रेक झाल्याने चिंता वाढली आहे. महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार व आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी शहर कोरोनामुक्त झाल्याचे समजून कोणीही शासन नियमांचे उल्लंघन करू नये. काळजी घ्यावी, मास्क व सॅनिटाइझर नियमित वापरावे, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, असे आवाहन केले आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पाच, नऊ व अकरावर्षीय बालिकांसह २३ महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे.

ताहाराबाद, जायखेडा, जळगाव (गा.) येथील पाच रुग्ण वगळता उर्वरित सर्व रुग्ण कॅम्प, सटाणा नाका, कलेक्टर पट्टा, संगमेश्‍वर, सोयगाव, नववसाहत व शहर परिसरातीलच आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी तीन दिवसांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. शहरात नव्याने ३६ रुग्ण दाखल झाले असून, शहरातील २७० अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com