esakal | नाशिककरांना दिलासा..आणखी चौदा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह! 
sakal

बोलून बातमी शोधा

corona 1.jpg

दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र त्यासंदर्भात जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाकडून खुलासा करण्यात आल्यानंतर संभ्रम दूर झाला. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात सात, मालेगाव सामान्य रुग्णालयात आणि नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल झाले.

नाशिककरांना दिलासा..आणखी चौदा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णाच्या संख्येत शुक्रवारी (ता. 3) वाढ झाली असून, नव्याने 15 रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय, मालेगाव रुग्णालय आणि महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी (ता. 2) रात्री दाखल झालेल्या सहा रुग्णांसह एकूण 37 रुग्णांपैकी 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, उर्वरित 25 रिपोर्ट धुळे प्रयोग शाळेकडे प्रलंबित आहेत. 

आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी सुरू
दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र त्यासंदर्भात जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाकडून खुलासा करण्यात आल्यानंतर संभ्रम दूर झाला. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात सात, मालेगाव सामान्य रुग्णालयात पाच आणि नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात तीन, असे एकूण 15 नवीन रुग्ण दाखल झाले. तत्पूर्वी, धुळे शासकीय प्रयोगशाळेकडे 37 जणांचे रिपोर्ट प्रलंबित होते. त्यापैकी 14 जणांचे रिपोर्ट शुक्रवारी सायंकाळी निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील तिन्ही कक्षांत सध्या पॉझिटिव्ह असलेल्या युवकांसह त्याची आई आणि दाखल रुग्ण अशा 39 संशयितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 791 नागरिक परदेशातून आलेले असून, त्यापैकी 324 नागरिकांचे होम क्वारंटाइन पूर्ण झालेले आहे. 467 नागरिक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांची आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी सुरू आहे. 
हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..
कोरोना संशयित रुग्णांच्या रिपोर्टसंदर्भात काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त चुकीचे होते. नाशिकमध्ये अद्याप फक्त एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी 

नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कोरोनाबाधितांची संख्या वाढलेली नाही. तसा कोणताही रिपोर्ट जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेला नाही. - डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय 

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!