कोरोनामुक्तीच्या उत्साहात केला ना मनमौजीपणा?...पुन्हा आढळला संशयित!

yeola people.jpg
yeola people.jpg

नाशिक / येवला : नाशिक व मालेगाव पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असलेल्या येवल्याचा आकडा ३२ वरून शून्यावर आल्याने जणू नागरिकांकडून उत्साह सुरू झाला आहे. नागरिकांच्या या मनमौजीपनाला आळा न बसल्यास पुन्हा रुग्णसंख्या उद्भवू शकते. त्यातच आज एक संशयित आढळून आल्याने येवलेकरांचे पुन्हा धाबे दणाणले आहे.त्यामुळे रुग्ण संख्या शून्य झाली म्हणजे कोरोणाला पूर्णविराम मिळाला असे नाही फक्त स्वल्पविराम असल्याने संख्या वाढू न देण्याची काळजी नागरिकांना घ्यावी लागणार आहे.

दुहेरी प्रयत्न कामी येऊन कोरोनामुक्तीच्या दिशेने पोहचला

गेल्या आठवड्यापासून येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.तत्पुर्वी मालेगाव,नाशिक पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण संख्या झाल्याने होमपीचवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विशेष लक्ष देत नाशिकसह येवल्यात अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.स्वतः आरोग्य मंत्र्यांनी येथे भेट देऊन मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी सूरज मांढरे देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते. भुजबळाचे येथील स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनीही परिस्थिती हाताळण्यासाठी सतत पाठपुरावा केला. नागरिकांनी वेळोवेळी गर्दी करून त्रास दिला परंतु तितक्याच प्रमाणात काळजीही घेतल्याने प्रशासन व नागरिक असे दुहेरी प्रयत्न कामी येऊन कोरोनामुक्तीच्या दिशेने पोहचला आहे.रुग्ण संख्या शून्यावर आल्याच्या आनंद नक्कीच आहे. मात्र,या आनंदाचा उत्सवच होऊ लागला की काय असे चित्र शहरात दिसत आहे. दुकानेही सुरू झाली मात्र गर्दी वाढत असल्याने नाशिकप्रमाणे नव्याने रुग्ण वाढण्याची दहशत नागरिकांच्या मनात वाढत आहे.३२ रुग्ण असताना काय मानसिकता असते याचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे,गर्दी टाळण्यासाठी सर्व नियम- निकष पाळल्यास पूर्णविराम मिळणे ही सहज शक्य आहे.आता नवा रुग्ण सापडणार नाही याची काळजी घेण्याचे कामही प्रशासनासह नागरिकांचे आहे हे नक्की!

येवल्यात कोरोनामूक्तीच्या उत्साहात.. नागरिकांकडून अतिरेक

सुरुवातीला येथील अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवत होता मात्र रिक्त असलेल्या प्रांताधिकारी पदावर उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन शांततेत पण योग्य दिशेने पावले टाकल्याने प्रशासनालाही कोरोना मुक्तीची किमया साध्य करता आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र गायकवाड व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जीवाचे रान करून रुग्णसेवा केली.मुख्याधिकारी संगीता नांदुरकर व चौकाचौकात तैनात त्यांच्या टीमने शहरातील गर्दी नियंत्रणासह फवारणी, स्वच्छतेची भूमिका निभावली.पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे,शहराचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व तालुक्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांचेही लॉकडाऊन राखण्यासाठी मोठे योगदान या दोन महिन्याच्या काळात मिळाले.गटविकास अधिकारी उन्मेष देशमुख  यांनी समनव्य राखत इतराकडून कामे करून घेतली. तहसीलदार रोहिदास वारुळेही सोपवलेली कामे पार पाडत होते.

बैठक घेत वेळोवेळी प्रशासनाला सूचना

मालेगाव,नाशिक पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण संख्या झाल्याने होमपीचवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विशेष लक्ष देत नाशिकसह येवल्यात अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.स्वतः आरोग्य मंत्र्यांनी येथे भेट देऊन मार्गदर्शन केले.जिल्हाधिकारी सूरज मांढरे देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच त्यांनी येथील रिक्त प्रांताधिकारी पदावर रात्री १० वाजता आदेश काढून अधिकारी नेमणुक केली. याशिवाय विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांनीही बैठक घेत वेळोवेळी प्रशासनाला सूचना केल्या. खासदार भारती पवार याही बैठका घेण्यासाठी दोनदा आल्या.

"सर्व ३२ रुग्ण बरे झाल्याने तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. प्रशासनाचे नियोजन,नागरिकांच्या सहकार्यातून हे शक्य झाले आहे.यापुढेही प्रशासन व नागरिकांनी कोरोनामुक्तीसाठी अधिक दक्ष राहावे. नागरिकांनीसुद्धा शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे."-छगन भुजबळ,पालकमंत्री,नाशिक


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com