Nashik: आयोध्येसाठी शिवसेनेचे योगदान पाहाच : राऊत; ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ प्रदर्शनाला शिवसैनिकांची गर्दी

शिवसेनेचे वाघ नसते, तर हिंदुत्वावरील अनेक वर्षांपासूनचा कलंक दूर झाला नसता, असा दावाही त्यांनी केला.
रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ प्रदर्शन पाहताना उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई व पदाधिकारी.
रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ प्रदर्शन पाहताना उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई व पदाधिकारी.esakal

सातपूर : अयोध्येतील राममंदिर लढ्यात शिवसेनेचे योगदान काय, असे विचारणाऱ्यांसाठी अयोध्येतील कारसेवेवरील ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे दालन खुले करण्यात आले आहे. डोळे उघडे ठेवा आणि ते पाहा’, अशा शब्दांत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

शिवसेनेचे वाघ नसते, तर हिंदुत्वावरील अनेक वर्षांपासूनचा कलंक दूर झाला नसता, असा दावाही त्यांनी केला. (Crowd of Shiv Sainiks at exhibition of Shiv Sena particioants in Ram Janmabhoomi Nashik)

अयोध्येतील सोहळ्यानिमित्त शिवसैनिकांनी कारसेवेत निभावलेल्या भूमिकेविषयी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून पक्षाच्या शहरातील महाअधिवेशनस्थळी आयोजित ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.

त्या वेळी ते बोलत होते. अयोध्येच्या राममंदिर संघर्षातील शिवसेनेचे योगदान सर्वांना माहिती व्हावे, यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्या वेळच्या आठवणी जागविल्या.

सोमवारी (ता. २३) रात्री उशिरा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे सातपूरला आगमन होताच शिवसैनिक देवा जाधव, धीरज शेळके, बाळा गवळी, शिवसेना गटनेते विलास शिंदे, माजी नगरसेवक भागवत आरोटे यांसह पदाधिकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर संजय राऊत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार राजन विचारे, अनिल देसाई, सुनील प्रभू, जयंत दिंडे आदींसह आमदार, खासदारांसह जिल्हाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी दालनाला भेट दिली.

रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ प्रदर्शन पाहताना उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई व पदाधिकारी.
Uddhav Thackeray News : हो, शिवसेना अन्‌ शिवसैनिक माझीच वडिलोपार्जित संपत्ती : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. सकाळपासून त्र्यंबक रोड गजबजून गेला होता. परिसर भगवामय झाला होता. शिवसैनिकांनी विविध घोषणा देत वातावरणनिर्मिती केली.

होर्डिंग्ज माध्यमातून भाजपवर टीका

प्रदर्शनामध्ये बाबरी मशिदीचा पाडलेला ढाचा, आंदोलनात शिवसेनेचे योगदान, बाळासाहेब ठाकरे यांची त्याबाबतची भूमिका.

लखनौ न्यायालयात बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी झालेली गर्दी. याबाबत माहिती देणारे होर्डिंग, शिवसैनिकांच्या मुलाखती चित्रफीत तर आहेतच; मात्र त्यासोबतच होर्डिंग्जच्या माध्यमातून भाजपवरही टीका करण्यात आली आहे.

रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ प्रदर्शन पाहताना उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई व पदाधिकारी.
PM Modi Nashik Visit: अयोध्याबरोबरच वाढले श्री काळारामाचे महत्त्व! मोदींच्या दौऱ्याचे फलित; भाविकांच्या संख्येत वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com