पालेभाज्यांनी घेतली मोठी उसळी; तासाभरात माल संपला!

vegetables
vegetablesesakal

पंचवटी (जि.नाशिक) : वाढत्या कोरोना संसर्गामुळे (corona virus) धास्तावलेल्या प्रशासनाने उद्यापासून (ता.12) कडक लॉकडाऊन (lockdown) जाहिर केले आहे. त्यामुळे भाजीपाला (vegetables) मिळेल की नाही, याबाबत धास्तावलेल्या गृहिणींनी (houesewife) खरेदीसाठी मोठी गर्दी (shopping) केल्याने अनेक ठिकाणचा भाजीपाला दुकान लावल्यापासून तासाभरात संपला.

vegetables
कोरोनाकाळात भाग्य चमकले पण प्रामाणिकपणाने अडविले!

तासाभरात माल संपला!

दरम्यान सर्वच भाज्यांच्या दराने मोठी उसळी घेतल्याने आगोदरच अडचणीत सापडलेल्या महिलांचे आर्थिक बजेटही कोलमडले. किरकोळ बाजारात कालपर्यंत पंचवीस तीस रुपयांत असणा-या मेथीच्या एका जुडीसाठी चक्क पन्नास रूपये मोजावे लागत होते. औषधे वगळता उद्यापासून (ता.12) सर्वच प्रकारच्या वस्तुंच्या विक्रीवर व खरेदीवर प्रशासनाने अंकुश लावला आहे. त्यामुळे केवळ मेडिकल स्टोअर्स वगळता सर्वच प्रकारची दुकाने उद्यापासून पुढील दहा दिवस बंद राहणार आहे. यातून रस्त्यावर व्यवसाय करणा-या भाजीविक्रेत्यांनही विक्रीस मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे रविवार पेठ, बोहोर पट्टी, गंगाघाट, भडक दरवाजा आदी भागातील भाजी विक्रेत्यांकडे ग्राहकांनी घरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे अनेकांचा माल पहिल्या तासाभरातच संपल्याचे दुर्मिळ दृष्यही दिसून आले. एरवी दिवसभर बसूनही विक्री होत नाही, एवढी विक्री पहिल्या तासातच झाल्याचे अनेक विक्रेत्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

vegetables
काय सांगता! 'या' बाजार समितीत कांदा फक्त दीड रुपये किलो

दरांत मोठी वाढ

मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याने किरकोळ बाजारात सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला होता. त्यामुळे कालपर्यंत पंचवसी ते तीस रूपयांत मिळणा-या मेथीच्या एका जुडीसाठी आज चक्क पन्नास रूपये मोजावे लागत होते. याशिवाय तीस चाळीस रूपये किलो दराने मिळणारे वांगी साठ ते एेंशी रूपयांपर्यंत पोहोचला होता. आरोग्य तज्ज्ञांनी भोपळ्याचे महत्व सांगितल्याने एरवीदहा ते पंधरा रूपयांत मिळणारा भोपळाही पंचवीस तीस रूपयांपर्यंत पोहोचला होता. अन्य पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्यांच्या दरांतही मोठी वाढ झाल्याने बजेट कोलमडल्याची भावना अनेक गृहिणींनी व्यक्त केली.

उद्यापासून भाजीपाला मिळणार नसल्याने संपूर्ण आठवड्याची खरेदी केली खरी, परंतु त्यासाठी एरवीपेक्षा दीडपट रक्कम अधिक मोजावी लागली.- ताराबाई शिंदे, शनी चौक, पंचवटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com