Nashik Crime News : सायखेड्यात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक; आरोपीस अटक

Crime News
Crime Newsesakal

चांदोरी (जि. नाशिक) : आई या मायेच्या नात्याला काळिमा फासणारी घटना निफाड तालुक्यातील सायखेडा गावात समोर आली आहे. येथील एका अज्ञात मातेने नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या जीवंत अर्भकाला फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अर्भकाला एका कुत्र्याने चावा घेतल्याने ते मृत अवस्थेत आढळून आले. (Dead female infant found in Saikheda Accused arrested Nashik Latest Crime News)

गोदाकाठ भागातील महत्वाच्या असणाऱ्या सायखेडा गावात वंजारगल्ली जवळ स्त्री जातीचे अर्भक १ दिवसाचे असून उघड्यावर सकाळी ७ ते ७:१५ च्या दरम्यान टाकून दिलेले असल्याने कुत्र्यांनी त्या अर्भकाचे लचके तोडले होते. सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी तात्काळ धाव घेत पंचनामा करत पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान गावातील आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र, खाजगी डॉक्टर यांचेकडे तसेच गोपनिय बातमीच्या आधारे तपास करत संबंधी २२ वर्षीय तरुणी पर्यंत पोहोचले.

यात ग्रामपालिक सदस्य गणेश कातकडे या आरोपीस भारतीय दंड विधान कलम ३१८ अन्वये अटक केली असून त्या तरुणीस वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक उर्मिला काठे, उर्मिला बिष्ट, पोलीस हवालदार घुगे,पोलीस नाईक मोठाभाऊ जाधव, भाबड, प्रकाश वाकळे, तानाजी झुर्डे, पोलीस हवालदार अहिरे, यांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पर्यंत पोहोचत गुन्ह्याची उकल केल्याने परिसरात कौतुक होत आहे.

Crime News
Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; ॲट्रॉसिटीन्वये गुन्हा दाखल

"सदर घटनेची माहिती प्राप्त झाली असून आरोपीस अटक केली आहे. अशा प्रकारच्या गुन्हयाची उकल करणे अत्यंत जिकरीची बाब असते.गुन्हयाच्या तपासात सायखेडा पोलिस ठाणेचे अधिकारी तसेच अंमलदार यांनी गुन्ह्माच्या अनुषंगाने दाखविलेली संवेदनशिलता व तत्परता यामुळे गुन्हयाची उकल झाली आहे."- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

"ही घटना निषेधार्थ असून सायखेडा पोलिसांनी अवघ्या चार पाच तासांमध्ये याचा तपास करून आरोपीस अटक केली आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आरोपीला कायद्यानुसार योग्य ते शासन होईल देखील परंतु अशा घटना घडूच नयेत यासाठी संस्थात्मक आणि सामाजिक दृष्ट्या सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यानेच अशा मानसिकतेला आळा बसेल."

- सौ रुपालीताई चाकणकर, अध्यक्ष , महिला आयोग महाराष्ट्र राज्य

Crime News
Job Fraud Crime : नोकरीच्या आमिषाने फसवणाऱ्या दोघां बहिणींविरुद्ध गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com