Super 110 Selection Exam : ‘सुपर ११०’ निवड चाचणीच्या अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ; या संकेतस्थळावर करा नोंदणी

Exam
Examesakal

Super 110 Selection Exam : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुपर ११० उपक्रमाच्या निवड परीक्षेसाठी अर्ज करण्याची ६ जुलैपर्यंत असलेली मुदत वाढविण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ९ जुलैला होणारी परिक्षा रद्द करण्यात आली असून ती आता १६ जुलैला होईल. (deadline for filing application for Super 110 selection test has been extended nashik news)

या उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी ऑफलाईन पद्धतीने होणारी नोंदणी प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करण्यात आली होती. ऑनलाईन पद्धतीचा परीक्षा अर्ज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता यावे यासाठी काही शैक्षणिक संस्था व संघटना यांनी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुद वाढवावी अशी मागणी केली होती.

त्यानुसार मुदत वाढ देण्यात आली आहे. सदर मुदत वाढ अंतिम असून ११ जुलैला ऑनलाईन प्रवेशाची लिंक रात्री बाराला बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. निवड परीक्षेचा अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने देखील भरता येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Exam
Tribal Nucleus Budget Scheme : न्यूक्लिअस बजेटच्या योजनांना कात्री; निधी इतरत्र वळविला

त्यासाठी खालील लिंकवर जाऊन https://forms.gle/zkRRbs5MKq3et9i36 अथवा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक पंचायत समिती मध्ये गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात परीक्षेचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला असून तिथेच तो भरावा लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात परीक्षेसाठी परीक्षा केंद्र असणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी च्या नियमित अभ्यासक्रमाबरोबर JEENEET या व्यावसायिक पात्रता प्रवेश परीक्षांसाठी नि:शुल्क निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरीब गरजू विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या निवड चाचणी परीक्षेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Exam
Super 110 Exam : ‘सुपर 110’ ची परीक्षा आता एक आठवडा पुढे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com