Nashik News: दरेगाव उड्डाणपुलाखाली जीवघेणा खड्डा; अंदाज येत नसल्याने अनेक अपघात

Pit under the flyover.
Pit under the flyover.

Nashik News: येथील जुना आग्रा रस्त्याच्या फेज तीनच्या कामाला विजेचा खांबामुळे मुहूर्त मिळत नाही. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. दरेगाव येथील उड्डाणपुलाच्या खाली मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

रस्त्याच्या मधोमध खड्डा असल्याने चालकांना अंदाज येत नसल्याने वाहने आदळतात. हा खड्डा तातडीने बुजवावा अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (Deadly pit under Daregaon flyover malegaon nashik news)

येथील दरेगाव जवळील उड्डाणपुलाखाली धुळे बाजूने येताना वळणावर दोन ते तीन फुटाचा मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात दिवसभर वाहने आदळतात. दिवसागणिक खड्डा मोठा होत आहे. यामुळे अनेक वाहनाचे नुकसान होत असल्याने येथील खड्डा तत्काळ बुजवावा. तसेच रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जुन्या- आग्रा महामार्गावरील फेझ तीनच्या खोळंबलेल्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. मागणी करूनही काम सुरू केले जात नाही. हा रस्ता देवीच्या मळ्यापासून एका बाजूस बंद आहे. रस्त्यावरील विजेचे खांब काढले जात नसल्याने कामाला मुहूर्त मिळत नाही. महापालिकेने निविदा काढून दोन ते तीन महिने उलटले तरीही काम सुरु होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Pit under the flyover.
Nashik News: मालेगावातील यंत्रमागधारकांच्या आशा पल्लवीत; नव्या समितीचे अध्यक्षपद दादा भुसेंकडे

ओवाढी नाल्यापासून ते दरेंगावपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात वाहने आदळतात. रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. दुचाकीस्वारांना रात्रीच्या वेळेस खड्याच्या अंदाज येत नसल्याने अनेक वाहने खड्यात आदळून लहान-मोठे अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूकही अनेकदा विस्कळित होते.

वाहनांच्या रांगा लागतात. हा रस्ता खराब असल्याने अनेक नागरिक धुळे व चाळीसगावकडे जाण्यासाठी मनमाड चौफुली मार्गावरुन जाणे पसंत करीत आहेत. महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

"मालेगावातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे काम थांबल्याने रोज अनेक अपघात होत आहेत. महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा आम आदमी पार्टीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल." - अल्ताफ हुसेन, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी.

Pit under the flyover.
Nashik Electricity Theft: वीजचोरीच्या 284 घटना, आरोपपत्र केवळ 18; मालेगावातील गंभीर स्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com