नाशिक : मनपा महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रजासत्ताक दिनीच मनपा महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ
medical officer
medical officeresakal

नाशिकः नाशिकमध्ये (nashik) आज सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचा (republic day 2022) उत्साह आहे. महापालिकेतही (nashik munciapl corporation) हा उत्साह होता. सारे ध्वजारोहण समारंभात व्यस्त होते. मात्र, काही वेळातच महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी (medical officer) सुवर्णा वाझे-जाधव यांचा मृतदेह आढळल्याची बातमी येऊन धडकली आणि साऱ्यांनाच धक्का बसला.

एका वाहनात त्यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

डॉ. सुवर्णा वाझे-जाधव या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. आज बुधवारी नाशिकमधील वाडीवऱ्हे परिसरातील एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, या घटनेने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिकची नेमकी वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

medical officer
प्रजासत्ताक दिनी हवाई दलाच्या विमानांची चित्तथरारक कसरती
डॉ. वाजे यांची ग्रस्त जळालेली कार.
डॉ. वाजे यांची ग्रस्त जळालेली कार.esakal

तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण

अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे प्रजासत्ताक दिनी एक अतिशय धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. (Nashik) मध्ये महापालिकेच्या (Municipal Corporation) महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुवर्णा वाझे-जाधव असे त्यांचे नाव आहे. सध्या घटनास्थळावर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यांनी तपास कार्य सुरू केले आहे. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह सापडतो काय, याबद्दल तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे.

medical officer
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचं पालन केल्यानं भाजपला का पोटदुखी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com