Nashik News: नाग, पंचगंगेला जे देताय, ते गोदावरीला का नाही? शासनाची दुटप्पी भूमिका

godavari river.jpg
godavari river.jpg

Nashik News: यंदाच्या पावसाळ्यात नाग नदीला पूर आल्याने नागपूर पाण्याखाली गेले. त्यामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होवू नये म्हणून अकराशे कोटी रुपये, तर दरवर्षी कोल्हापूरच्या पंचगंगेला पूर येत असल्याने पिलरचा पूल बांधण्याचा प्रस्ताव जवळपास निश्चित झाला आहे.

त्यामुळे विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना पूर आल्यानंतर बळकटीकरणासाठी शासनाने तातडीने निधी देते. परंतु, गोदावरीला पूर आल्यानंतर उपाययोजनांसाठी निधी देत नसल्याने गोदावरी संदर्भात दुटप्पी भूमिका का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Demand to remove obstruction of Godavari flood line nashik news)

सप्टेंबरमध्ये नागपूर शहर व परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नागपूर शहर पाण्याखाली गेले. त्यामुळे या प्रकाराची पुनरावृत्ती होवू नये म्हणून राज्य शासनाने अकराशे कोटी रुपयांच्या उपाययोजनांच्या आराखड्याला तातडीने मंजुरी दिली.

त्यात सांडपाण्याच्या जीर्ण भिंतीचे काँक्रिटीकरण, रिटेलिंग वॉल बांधणे, धरणाची सुरक्षा वाढविणे, माती व धरणाचे सेक्शन दूर करणे, हायड्रोलिक कॅल्फ्लुलेशन करणे, नदी नाल्यांचे अतिक्रमण काढणे, इंटिग्रेटेड ड्रेनेज सुविधा निर्माण करणे आदी कामांचा समावेश आहे. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी मार्गाचे काम सुरू असून काम करताना कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाण्याला अडथळा निर्माण होवू नये म्हणून पिलरचा पूल बांधण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून योजना मंजूर करून घेतली जाणार आहे. दरम्यान, नागपूरची नाग व कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या सुरक्षेसाठी शासनाने तत्परता दाखवत निधी मंजूर केला.

godavari river.jpg
Sakal Exclusive: पुणे, मुंबईच्या तुलनेत नाशिकची हवा समाधानकारक! नाशिककरांनो काळजी घ्या...

परंतु, गोदावरी नदीसंदर्भात पंधरा वर्षांपासून ओरड सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नद्यांच्या बाबतीत दुटप्पीपणा सोडावा, अशी मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.

मिळकतींचा विकास थांबला

२००८ मध्ये गोदावरी व उपनद्यांना महापूर आला. बाजारपेठेत पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाने निळी व लाल पूररेषा आखली. त्यामुळे गोदावरी नदीच्या बाजूला असलेल्या करोडो रुपयांच्या मिळकती कायदेशीर पेचात अडकल्या.

त्या मिळकतींचा विकास थांबला असून, पूररेषा कमी करण्याबरोबरच गोदावरी नदीतील पुराचे अडथळे दूर करण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. त्यामुळे पंचगंगा व नाग नदीच्या पुरामुळे तातडीने उपाययोजना करताना नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या समस्यादेखील सोडविण्याची मागणी होत आहे.

godavari river.jpg
Diwali Precaution: दिवाळी सुटीवर जाताय, ‘एक अर्ज चौकीला’ द्या! पोलिसांचा अभिनव उपक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com