"देवाचं दर्शन घ्यायचयं तर अगोदर मास्क लावून या" त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे निर्देश

trimbak 7.jpg
trimbak 7.jpg
Updated on

नाशिक -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात मास्क लावून काम करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दिले आहेत. तसेच भाविकांनीही मंदिर परिसरात दर्शनाला येतांना तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधावा असे सांगण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये विदेशातील भाविकही दर्शनाला येत असल्याने देवस्थानने  हा निर्णय घेतला असून मंदिर परिसरात अस्वच्छता करू नये, स्वच्छता राखावी असे निर्देश ट्रस्टकडून देण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात धुमाकूळ

कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे काही संशयित आढळले आहे. राज्य सरकारने प्रत्येक विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरसबद्दल सावधगिरी बाळगत आहे. राज्यात बाधित भागांतून ४५४ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसलेल्या प्रवाशांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. आतापर्यंत १६७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १६१ जणांना कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला.

नाशिकमधील उद्योजक रुग्णालयात

व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये गेलेले उद्योजक नाशिकमध्ये परतले असून, त्यांना बुधवारी (ता. ४) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विशेष उपचार कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल गुरुवारी (ता. ५) सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, परदेशातून परतलेल्या नाशिक शहरातील 18, तर जिल्ह्यात तीन जणांचे आरोग्य विभागाच्या विशेष पथकाकडून नियमित निरीक्षण केले जात आहे. तर तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोरोनाग्रस्त देशातून नाशिकमध्ये आलेल्या 18 जणांवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून लक्ष ठेवले जात आहे.

एकाच कंपनीचे आठ कर्मचारी

सातपूर औद्योगिक वसाहतीतील आठ कर्मचारी हे इटली येथे कंपनीच्याच कामकाजानिमित्ताने गेले होते. हे आठही कर्मचारी गेल्या 29 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये परतले आहेत. इटलीचा समावेश कोरोनाग्रस्त देशात असल्याने या आठही जणांची आरोग्य चाचणी जिल्हा रुग्णालयात घेण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तरीही त्यांची आरोग्य यंत्रणेकडून नियमित तपासणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com