esakal | तंत्रज्ञानाचा भन्नाट आविष्कार! अवघ्या नव्वद सेकंदात वस्तु होणार शुद्ध..
sakal

बोलून बातमी शोधा

tech nashik.jpg

बँकातील नोटा, दवाखान्यात विविध साधने, घरातील दैनदिन वापराच्या सर्व वस्तू, भाजीपाला, किराणा वस्तू, अंगावरील दागदागिने, मोबाईल, घड्याळ, प्लास्टिक वस्तू दीड मिनिटात घातक विषाणू व विविध जिवाणू नष्ट करून संक्रमण रोखण्यास मदत करणार आहे. कोरोना सारखें संक्रमण रोखण्यास हे बॉक्स महत्वाची भूमिका बजावणारे आहे.

तंत्रज्ञानाचा भन्नाट आविष्कार! अवघ्या नव्वद सेकंदात वस्तु होणार शुद्ध..

sakal_logo
By
घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / दाभाडी : लॉकडाऊननंतर वापरातील सर्व वस्तू, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विषाणू मुक्त करण्याचा विडा नाशिकच्या तरुण उद्योजकाने उचलत एका अविष्काराची निर्मिती केली आहे. बँकातील नोटा, किराणा माल, भाजीपाला बाजारातून खरेदी केलेला सर्व प्रकारच्या वस्तू अवघ्या नव्वद सेकंदात अतिसूक्ष्म विषाणू व जिवाणूमुक्त करणारे शुद्धीकरण बॉक्स विकसित केले आहे.

नाशकात विकसित झालं एक नवतंत्रज्ञान...

अंबड येथील अनिल सोनवणे या  इलेक्ट्रॉनिक्समध्ये लघु उद्योजकाने स्वत:च्या प्रिझम इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीममध्ये उपकरण तयार केले आहे.  भविष्यात लोकांच्या जीवनशैलीत होणारे संभाव्य बदल लक्षात घेता आता प्रत्येक वस्तू हाताळताना भीती बाळगली जाणार आहे. त्यावर मात करण्यासाठी खात्रीशीर दिलासा देणारं युनिट निर्माण करण्यात आले आहे. UV LIGHT ENERGY (253.7nm) वर आधारित तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.यूव्ही प्रकाश उर्जेद्वारे अतिसूक्ष्म (10nm a micron) आकाराचे विषाणू/जिवाणू अवध्या नव्वद सेकंदात नष्ट होतात.अतिसूक्ष्म जीव नष्ट करण्यासाठी यूव्ही प्रकाश ऊर्जा ज्या तंत्राला जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ), यूएसएफडीओ आणि डीआरडीओ सारख्या नामांकित संस्थानी प्रमाणित केले आहे. या बॉक्स मध्ये बँकातील नोटा, दवाखान्यात विविध साधने, घरातील दैनदिन वापराच्या सर्व वस्तू, भाजीपाला, किराणा वस्तू, अंगावरील दागदागिने, मोबाईल, घड्याळ, प्लास्टिक वस्तू दीड मिनिटात घातक विषाणू व विविध जिवाणू नष्ट करून संक्रमण रोखण्यास मदत करणार आहे. कोरोना सारखें संक्रमण रोखण्यास हे बॉक्स महत्वाची भूमिका बजावणारे आहे. विषाणू आणि जिवाणू यांचा DNA शृंखला नष्ट करणारे हे UV प्रकाश ऊर्जा तंत्रज्ञान आहे.वस्तू शुद्ध झाल्याने हवा शुद्धीकरणास हे तंत्रज्ञान मदत करणारे ठरणार असल्याचा दावा सोनवणे यांनी केला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

...अशी सुचली संकल्पना 
पहिल्या लॉकडाऊन होण्यापूर्वी बंगलोर येथून मोठ्या मुश्किलेने नाशिक गाठताना सहप्रवासी सोबत अनुभवलेली भीती आणि लॉकडाउन काळानंतर जीवनशैलीत होणारे बदल याचा सामाजिक अभ्यास करून वस्तू विषाणू मुक्त करता येतील का यांचा ध्यास घेतला आणि एका अनोख्या तंत्राचा जन्म झाला. 

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार

'घरबसल्या सुचलेल्या विचाराला एका नव्या तंत्रज्ञानाला जन्म देऊन गेला आहे. या शुद्धीकरण बॉक्सची काही भागांची निर्मिती नाशिक येथेच केली जाणार आहे. हे शुद्धीकरण बॉक्स लवकरच उपलब्ध होईल. - अनिल सोनवणे, 
संचालक, प्रिझम इलेक्ट्रॉनिक सिस्टम, अंबड नाशिक