Diwali 2023: शंभरहून अधिक देशांमध्ये दिवाळीचा फराळ; टपाल विभागाची पार्सल सेवा

Postal department staff checking before sending Diwali snacks abroad
Postal department staff checking before sending Diwali snacks abroadesakal

Diwali 2023 : टपाल विभागाच्या पार्सल सेवेमुळे शंभरहून अधिक देशांमध्ये दिवाळी फराळाचा सुगंध दरवळत आहे. गेल्या १७ दिवसांपासून फराळ पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दैनंदिन सुमारे दोन लाखाप्रमाणे शुक्रवार (ता. १०)पर्यंत सुमारे तीन कोटी चार लाख रुपयांचा महसूल विभागास प्राप्त झाला आहे. (Diwali Faral parcel service has been made available in more than hundred countries by postal department nashik news)

शहर-जिल्ह्यातील अनेक हिंदू बांधव शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने जगाच्या विविध देशांमध्ये वास्तव्यास आहे. काही कारणांमुळे यातील बहुतांशी बांधवांना दिवाळीत मायदेशी परतणे शक्य होत नाही. कुटुंबाची माया, प्रेमस्वरूप दिवाळी फराळास मुकावे लागत असते. अशी वेळ येऊ नये, यासाठी विदेशात असलेल्या बांधवांना कुटुंबीयांकडून टपाल पार्सल सेवेच्या माध्यमातून फराळ पोचविले जाते.

या वर्षी शंभरहून अधिक देशांमध्ये फराळाचा सुगंध दरवळला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका देशांमध्ये सर्वाधिक फराळाचे पार्सल पोच झाले आहेत. दैनंदिन नाशिक विभागातून ५०, तर शहरातील ‘जीपीओ’तून २० पार्सल बुक होत आहे. यासाठी टपाल विभागाकडून डाकघर निर्यात केंद्र असे विशेष काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Postal department staff checking before sending Diwali snacks abroad
Nashik Dengue Disease: डेंगीच्‍या बदलत्‍या स्वरूपाने धोक्‍याची घंटा; रुग्‍णसंख्येत झपाट्याने वाढ

यावर आहे बंदी

सुरक्षा कारणास्तव काही वस्तू, पदार्थ पार्सल करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्वलनशील वस्तू, द्रवपदार्थ तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा यात समावेश आहे. टपाल विभागाकडून पॅकिंगसाठी विशेष बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत.

दिवाळी फराळास या देशातील बांधव मुकणार

दोन देशांमध्ये सुरू असलेली युद्ध आणि सुरक्षाच्या कारणास्तव चार देशांची पार्सल सेवा टपाल विभागाकडून बंद करण्यात आली आहे. इस्राईल आणि युक्रेन याठिकाणी सुरू असलेले युद्ध, तसेच चीन आणि पाकिस्तान देशाशी सुरक्षा कारणास्तव येथील पार्सल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या चारही देशातील हिंदू बांधव यंदाही दिवाळी फराळास मुकणार आहेत.

Postal department staff checking before sending Diwali snacks abroad
Nashik News: आधीच सुट्यांचा त्रास, त्यात नोटांचा मनस्ताप; दिवाळीच्या सणासुदीत पैशांसाठी परवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com