esakal | पुणे सिरम इन्स्टिट्यूटमधून उत्तर महाराष्ट्रासाठी 'इतके' कोविशिल्ड लसीचे डोसेस; 50 केंद्रातून लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

covishield vaccine.jpg

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अश्या विविध जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीच्या डोसेसचं वितरण करण्यात येत आहे. बुधवार (ता.१३) रात्रीपर्यंत या लसीचा साठा नाशिकहून संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचवण्याचं नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गंडाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

पुणे सिरम इन्स्टिट्यूटमधून उत्तर महाराष्ट्रासाठी 'इतके' कोविशिल्ड लसीचे डोसेस; 50 केंद्रातून लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून उत्तर महाराष्ट्रासाठी तब्बल 1 लाख 32 हजार कोविशिल्ड लसीचे डोसेस पाठवण्यात आले असून त्याचे वितरण आरोग्य प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अश्या विविध जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीच्या डोसेसचं वितरण करण्यात येत आहे. बुधवार (ता.१३) रात्रीपर्यंत या लसीचा साठा नाशिकहून संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचवण्याचं नियोजन करण्यात आलंय. दरम्यान यासंदर्भात आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गंडाल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी असे आहे लस वितरण

नाशिक 43,440,
अहमदनगर 39,290
धुळे 12,430
जळगाव 24,320
नंदुरबार 12,410

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी

नाशिककरांचाही आता कोरोनापासून बचाव होऊ शकणार आहे. कारण नाशिक जिल्ह्यातही सिरमची कोविशिल्ड लस पोहचली आहे. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आज (ता.१३) पहाटे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कोल्ड स्टोरेज युनिटमध्ये कोविशिल्ड लस पोहचली आहे.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

50 केंद्रातून लसीकरण

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोव्हिशिल्डची लस ग्रामीण भागात नेण्याची व्यवस्था केली आहे.विभागीय लास भांडार येथील कोल्ड स्टोरेज मध्ये ही लस ठेवली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोरोना लस उत्तर महाराष्ट्रासाठी 50 केंद्रातून लसीकरण होणार आहे. लाभार्थ्यांना लस वितरण करेपर्यत तापमान मेंटेन केले जाणार आहे. आज सर्व जिल्हयाना लस पोहोच केली जाणार आहे.
16 तारखेला ही लस वितरित केली जाणार आहे.

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

पहिल्या टप्प्यात एकूण 43,440 डोसेस

नाशिक जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण 43,440 डोसेस पोहचले असून पहिल्या टप्प्यात आरोग्य देणार कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण 17 केंद्रांवर लसीकरण होणार आहे तर दुपारी 12 वाजता नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी लसीचं वितरण होणार आहे.

loading image