Nashik News: कोटीचा ठेका देऊनही ड्रेनेज समस्या सुटेना! सणासुदीत सिडकोत रहिवाशांच्या घरात सांडपाणी

Drainage water into houses file photo
Drainage water into houses file photoesakal

Nashik News : सिडकोतील विविध भागात, तसेच चौकाचौकात ड्रेनेज तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगी, मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांमध्ये वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

वर्षभरासाठी सिडकोतील ६ प्रभागांकरिता तब्बल १ कोटी ५३ लाखांचा ठेका देऊनही ड्रेनेज समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

नागरिकांच्या ड्रेनेज समस्या सुटत नसल्याने एवढे करोडो रुपये नेमकी कुठे जातात, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Drainage problem not solved even after giving contract of crores Sewage in houses of cidco residents during festive season Nashik News)

सिडको विभागीय कार्यालय तक्रार निवारण कक्षात रोज ड्रेनेज तुंबणे, चेंबर सफाई, चोकप काढणे याबाबत अनेक तक्रारी येतात. विविध प्रभागांमध्ये ड्रेनेज तुंबण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहे.

सिडकोची २५ हजाराहून अधिक घरे आहेत. यासह अनेक रो. हाऊस, छोट्या- मोठ्या सोसायटी आहेत. मात्र सिडकोतील नागरिकांनी गेल्या काही वर्षांपूर्वी घरांचे वाढीव बांधकाम केले आहे. बांधकाम करताना टाकलेल्या ड्रेनेजलाइनवरही अतिक्रमण करण्यात आले आहे.

यामुळे ड्रेनेज तुंबल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. असे असले तरीही मनपाच्या भुयारी गटार तसेच ड्रेनेज विभागाकडून वर्षभरासाठी सुमारे १ कोटी ५३ लाख रुपये चालू वर्षांसाठी केवळ मेंटेनेस कामासाठी ठेकेदारांना देण्यात आले आहे.

चेंबर साफसफाई, चोकअप काढणे, ड्रेनेजलाइन साफ करणे, चेंबर दुरुस्ती, तुटलेले ढापे बदलणे, ढाप्याची रिंग टाळणे आदी कामे येतात. दरवर्षी किमान दीड करोड रुपये ड्रेनेज साफसफाईसाठी दिले जात असतानाही महापालिकेत दिवसभरात वीस ते पंचवीस तक्रारी येतात.

व्यतिरिक्त प्रत्येक आजी- माजी नगरसेवकाच्या कार्यालयातही दिवसभरात पाच ते सात तक्रारी येतात. असे असले तरीही संबंधित ठेकेदारांकडून केवळ काही तक्रारींचे निवारण केले जात नसल्याचा आरोप सिडकोवासीय आरोप करीत आहे.

Drainage water into houses file photo
NMC News: आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेसाठी राखीव वेतन निधीतून तरतूद

ड्रेनेज विभागाचा भोंगळ कारभार

सिडको ड्रेनेज विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांची पाठराखण केली जात असल्याचा थेट आरोप सिडकोवासीय करत आहे.

गेल्या पंधरा दिवसात सिडको विभागीय कार्यालयातील तक्रारीमध्ये ड्रेनेज विभागाच्या एकूण ९२ तक्रारी आल्या आहेत. यामधील काही तक्रारी वेळेवर न सुटल्याने पुन्हा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.

साईबाबानगर येथील ड्रेनेज समस्यांबाबत स्थानिक रहिवाशांनी २२ दिवसांपूर्वी अर्ज दिलेला असूनही त्यांची समस्या सोडविण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

"सिडकोमध्ये रोजचं ड्रेनेजच्या समस्या वाढतच चालल्या असून गेल्या अनेक वर्षापासून कमी व्यासाच्या ड्रेनेजलाइन टाकण्यात आलेल्या आहेत. आता नवीन मोठ्या व्यासाच्या लाईन टाकण्याची गरज असून, वाढते अतिक्रमणही या बाबीस कारणीभूत ठरत आहे."

- वैभव देवरे, सामाजिक कार्यकर्ते

"ऐन सणासुदीत नागरिकांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी येत असून सण- उत्सव साजरे कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास जनआंदोलन छेडणार आहे."- विशाल डोखे, सामाजिक कार्यकर्ते

Drainage water into houses file photo
NMC News: ‘ई- वेस्ट’ संकलनासाठी प्रस्ताव; नोंदणीकृत संस्थांना मिळणार संकलनाची परवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com