#COVID19 : तिसऱ्या टप्प्यातील होम-क्वारंटाईन्स वाढण्याची शक्‍यता..नाशिकमध्ये घेतली जातेय 'अशी' खबरदारी

quarantine 2.jpg
quarantine 2.jpg

नाशिक : कोरोना विषाणूने साऱ्या जगभर थैमान घातलेले आहे, तर भारतही या विषाणूच्या सावटाखाली आहे. येत्या एप्रिलमध्ये या विषाणूचा तिसरा टप्पा अर्थात सामाजिक संसर्गात जाणार आहे. त्यामुळे या काळात कोरोना विषाणूबाधित वा संशयितांची संख्या वाढण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यापार्श्‍वभूमीवर बाधितांसाठी स्वतंत्र कक्ष तर संशयितांसाठीही स्वतंत्र 100 खाटांचे नियोजन जिल्हा रुग्णालयातील सिंहस्थ कुंभमेळा या नवीन इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. तर, स्वाईन फ्ल्यु व साथीच्या आजारांचे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात येणार आहे. 


सिव्हिलमधील कुंभमेळा इमारतीत सोय : स्वाईन फ्ल्यु, साथीचे रुग्ण मनपाच्या रुग्णालयात 
 
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन यांच्या सातत्याने बैठक होते आहे. याच उपाययोजनाच्या दृष्टिकोनातून रविवारी (ता. 29) सकाळी जिल्हा रुग्णालयात आरोग्य उपसंचालक डॉ.एम.आर. पटनशेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. संजय गांगुर्डे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. नितीन रावते, डॉ. निलेश पाटील उपस्थित होते. 

बाधितांसाठी 16 खाटांचे स्वतंत्र कक्ष
येत्या एप्रिल महिन्यात विषाणू प्रादूर्भावाचा तिसरा टप्पा सुरू होणार असल्याने, या काळात संशयित व बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बाधितांसाठी 16 खाटांचे स्वतंत्र कक्ष असून, संशयितांसाठी 84 खाटांचे नियोजन जिल्हा रुग्णालयाच्या सिंहस्थ कुंभमेळा या चारमजली इमारतीमध्ये केले जाणार आहे. होम-क्वारंटाईन रुग्ण शक्‍य नसल्यास त्यांना या इमारतीमध्ये दाखल केले जाणार आहे. त्यासाठीची पाहणी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही केली आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनीही आदेश दिले आहेत. त्यादृष्टीकोनातून येत्या दोन दिवसात या इमारतीमध्ये तसे नियोजन केले जाणार आहे. 

स्वाईन फ्ल्यु कक्ष हलविणार 
सिंहस्थ कुंभमेळा इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्वाईन फ्ल्यु विशेष कक्ष आहे. सदरची इमारत कोरोनासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या इमारतीतील स्वाईन फ्ल्युचे रुग्ण महापालिकेच्या कथडा येथील डॉ. जाकीर हुसैन रुग्णालयात हलविणार आहेत. तर तीन मजल्यावर असलेल्या ऑर्थो, फिमेल मेडिकल, सर्जिकल वॉर्डचे रुग्ण मुख्य इमारतीसह अन्य वॉर्डमध्ये हलविण्यात येणार आहेत. तसेच, साथीच्या आजारांचे रुग्णही महापालिकेच्या सहा विभागातील रुग्णालयांमध्ये दाखल केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com