esakal | लॉकडाउनमध्ये चक्क इतके गुन्हे दाखल? अद्यापही कारवाई सुरूच!
sakal

बोलून बातमी शोधा

crime 111.png

मार्चपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे 22 मार्चला जनता कर्फ्यू, तर 23 मार्चपासून ते आतापर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आले. प्रारंभीचे तीन लॉकडाउन अत्यंत कठोर स्वरूपाचे, तर चौथ्या लॉकडाउनपासून काहीशी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम आहेत.​

लॉकडाउनमध्ये चक्क इतके गुन्हे दाखल? अद्यापही कारवाई सुरूच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मार्चपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे 22 मार्चला जनता कर्फ्यू, तर 23 मार्चपासून ते आतापर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आले. प्रारंभीचे तीन लॉकडाउन अत्यंत कठोर स्वरूपाचे, तर चौथ्या लॉकडाउनपासून काहीशी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम आहेत.


शहर पोलिसांकडून अद्यापही कारवाई
मार्चपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे 22 मार्चला जनता कर्फ्यू, तर 23 मार्चपासून ते आतापर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आले. प्रारंभीचे तीन लॉकडाउन अत्यंत कठोर स्वरूपाचे, तर चौथ्या लॉकडाउनपासून काहीशी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांत तब्बल साडेआठ हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आता, सर्वच दुकाने सुरू झाल्याने अनेक नागरिक जीवनावश्‍यक वस्तूंचे कारण पुढे करत फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. यातील काही बेशिस्त नागरिकांवर शहर पोलिस अद्यापही कारवाई करीत आहेत. लॉकडाउनच्या काळात जमावबंदीचे उल्लंघन करणे अनेकांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील सुमारे साडेआठ हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल केले असून, दोन हजारांहून अधिक वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत. 

इतके गुन्हे दाखल

त्यानुसार परिमंडळ एकच्या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पाच हजार 249, तर परिमंडळ दोनमधील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तीन हजार 170 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक एक हजार 313 गुन्हे सरकारवाडा पोलिस ठाणे, तर त्याखालोखाल एक हजार 280 गुन्हे गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे शहर पोलिसांनी दोन हजार 213 वाहनेही जप्त केली आहेत. यात सर्वाधिक 295 वाहने नाशिक रोड, त्याखालोखाल 292 वाहने सातपूर पोलिसांनी जप्त केली आहेत. ही वाहने बॉंडद्वारे परत केली जात आहेत. 

हेही वाचा > निर्दयीपणाचा कळस! तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..
 
मास्क न वापरणारेही अडकले... 
त्याचप्रमाणे, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात मास्कचा वापर बंधनकारक आहे. असे असले तरीही मास्कचा वापर न करणाऱ्या एक हजार 587 नागरिकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

पोलिस ठाणेनिहाय दाखल गुन्हे (कंसात गुन्ह्यांची संख्या) : 
भद्रकाली (808), सरकारवाडा (1,313), गंगापूर (1,280), आडगाव (307), म्हसरूळ (241), पंचवटी (363), मुंबई नाका (937), अंबड (493), इंदिरानगर (464), सातपूर (745), उपनगर (504), नाशिक रोड (555), देवळाली कॅम्प (409).  

 
 

loading image