इंग्रजी माध्यमाचे शिक्षक मानधनापासून वंचित; आंदोलनाचा इशारा

teachers
teachers esakal

नाशिक : महापालिकेकडून इंग्रजी माध्यमाच्या शाळा (english medium school) सुरू करण्यात आल्या. मात्र, या शाळांमधील शिक्षकांना तीन वर्षांपासून मानधन न मिळाल्याची बाब समोर आली आहे. मानधनाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर फौजदारी कारवाई करण्याचा दम प्रशासनाने दिला आहे. शिक्षकांचे मानधन पंधरा दिवसात न दिल्यास प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. (English-medium-teacher-not-getting-salary-last-3-months-jpd93)

मानधन मागितल्यास फौजदारीच्या कारवाईचा दम

महापालिकेमार्फत सन २०१३ पासून सिडकोतील विश्वासनगर, रायगड चौक व फुलेनगर या भागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. या शाळांसाठी मानधनावर शिक्षक व मदतनिसांची नियुक्ती करण्यात आली. २३ नोव्हेंबर २०१३ ते ३० एप्रिल २०१८ पर्यंत या शिक्षकांना महापालिकेकडून दर सहा महिन्यांनी मुदतवाढ व मानधन अदा केले जात होते. मात्र, त्यानंतर अचानक मानधन बंद करण्यात आले. यासंदर्भात शिक्षण विभागाची पंधरा वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, प्रशासनाने शिक्षकांना कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. ३० एप्रिल २०१८ नंतर शालेय कामकाज न करण्याचे आदेशदेखील जारी केले नाही. शिक्षक व मदतनिसांकडून शालेय कामकाज करून घेतले. शालेय कामकाज करीत असल्याचे शाळांच्या मुख्याध्यापकांना व केंद्रप्रमुखांनादेखील प्रशासनाने लेखी कळविले. कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना या शिक्षण काम करून दिले जात आहे. परंतु, प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. उलट मानधनाची मागणी करणाऱ्या शिक्षकांना प्रशासनाने दम भरला असून, मानधनाची मागणी केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा लेखी इशारा दिला आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांनी आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेत निवेदन दिले. पंधरा दिवसात शिक्षकांना मानधन न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ३० एप्रिल २०१८ रोजी बंद करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्तांनी घेतला. त्यानुसार शाळा बंद करण्यात आले आहेत. त्यानंतर इंग्रजी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना मुदतवाढ दिली नाही परिणामी त्यांचे मानधन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. - सुनीता धनगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग महापालिका.

teachers
नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?
teachers
नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com