Nashik Crime: बनावट देशी दारु कारखाना उद्‌ध्वस्त; 19 लाखाचा ऐवज जप्त

Bharari team of State Excise Department along with the suspect and seized the fake country liquor factory.
Bharari team of State Excise Department along with the suspect and seized the fake country liquor factory.

Nashik Crime : मालेगाव-धुळे जिल्ह्याच्या सिमेवरील ताथुळ-आर्वी ठोंबऱ्या शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी व मालेगाव येथील पथकाने गट नं.३५२/२ मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून बनावट देशी दारु निर्मितीचा कारखाना उद्‌ध्वस्त केला.

या कारवाईत पथकाने स्पिरीट, तयार ब्लेंड, बनावट देशी दारु, इलेक्ट्रिक ब्लेंडींग मशीन, वीजपंप, बुच सील करण्यासाठीचे ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन, दारुची तिव्रता मोजणारे हायड्रोमीटर, खोकी, कागदी लेबल, रिकाम्या बाटल्या असा सुमारे १९ लाख १६ हजार १८८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. (Fake country liquor factory destroyed nashik crime news)

बुधवारी (ता. २२) सकाळी ही कारवाई करण्यात आली. यात गणेश सखाराम शिंदे (वय ३०, रा. आर्वी) याला अटक करण्यात आली असून मद्य बनविणारे साहित्य पुरवठादार, स्पिरीट पुरवठादार व अन्य संशयित फरार आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची दारुबंदी गुन्ह्यासंदर्भात कारवाई सुरु होती. या दरम्यान पथकाला मिळालेल्या माहितीवरुन ठोंबऱ्या शिवारात छापा टाकला असता बनावट देशी दारु निर्मितीचा कारखाना मिळून आला. पथकाने हा कारखाना उद्‌ध्वस्त करत सर्व साहित्य व ऐवज जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांच्या सुचनेनुसार नाशिक विभागाचे अधिक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए. जी. सराफ, व्ही. बी. पाटील, मालेगाव विभागाचे दुय्यम निरीक्षक कडभाने, धुळेचे दुय्यम निरीक्षक श्री. धनवटे श्री. इंगळे, जवान भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर, धनराज पवार, महेश सातपुते, जवान, पानसरे, गाडे, अस्वले, पालवी आदींनी ही कारवाई केली.

Bharari team of State Excise Department along with the suspect and seized the fake country liquor factory.
Nashik Bribe Crime: वनविभागाचे दोघे लाचखोर ACBच्या जाळ्यात

भरारी पथकाच्या या कारवाईत ६०० लीटर स्पिरिट, ३०० लिटर तयार ब्लेंड, ७१ बॉक्स बनावट देशी दारु, इलेक्ट्रिक ब्लेंडिंग मशीन, एक अश्‍वशक्तीचा वीजपंप, बुचांना सिल करण्यासाठी वापरण्यात येणारे ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन, दीड लिटर इसेन्स, हायड्रोमीटर, थर्मामिटर, चंचुपात्र, बनावट रॉकेट देशी दारु संत्रा नावाचे कागदी लेबल, पत्री बुच, रिकाम्या बाटल्या, चिकटटेप, खोक्याचे पाटीशन आदी १९ लाख १६ हजार १८८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

कारवाईच्या प्रसंगी गणेश शिंदे हा एकमेव संशयित घटनास्थळी मिळून आला. भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक ए.जी. सराफ चौकशी व तपास करीत असून अन्य संशयितांचा शोध घेत आहेत. दरम्यान अवैद्य मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ यावर अथवा व्हॉटसॲप क्रमांक ८४२२००११३३ यावर कळवावे असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Bharari team of State Excise Department along with the suspect and seized the fake country liquor factory.
Nashik Crime: पालकांनो सावधान! शहरात 20 दिवसात 16 मुलींचे अपहरण; नियमित संवादाची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com