Nashik Farmer Protest : आश्‍वासनानंतर अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार

शेतकरी संघटनेच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील पदाधिकाऱ्यांशी शनिवारी चर्चा करताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ.
After assurance Sudhakar Mughal called off food sacrifice movement nashik news
After assurance Sudhakar Mughal called off food sacrifice movement nashik newsesakal

Nashik Farmer Protest : जिल्हा बँकेने सुरू केलेली सक्तीची कर्जवसुली थांबवावी, शेतकरी कर्जाची जबाबदारी शासनाने घेऊन त्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, या प्रमुख मागण्यांसाठी दहा दिवसांपासून शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन शनिवारी (ता. २९) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या आश्‍वासनानंतर मागे घेतले. (After assurance Sudhakar Mughal called off food sacrifice movement nashik news)

मात्र, शेतकऱ्यांनी संपूर्ण न्याय मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुलीसंदर्भात व शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उतारावरील नावे लावणे तत्काळ बंद करणे, तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गत दहा दिवसांपासून श्री. मोगल यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते.

दरम्यान, कृषिमूल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल यांनी शनिवारी आंदोलकांची भेट घेत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात येत्या मंगळवारी (ता. १) मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांबरोबर सहकार खाते व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर तुमची भेट घडवून आणून त्यावर चर्चा करण्यात आश्‍वासन देत श्री. झिरवाळ यांनी दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

After assurance Sudhakar Mughal called off food sacrifice movement nashik news
Nashik News : गर्भवती महिलेवर एकाच वेळी दोन्ही वॉल्व्ह रिप्लेसमेंट अन्‌ प्रसूती; ‘एसएमबीटी’त वाचविला महिलेचा जीव

या आश्वासनानंतर सुधाकर मोगल यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. मात्र जोपर्यंत बँकेचा प्रश्न मिटत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन व उपोषण सुरूच राहील, असे सांगितले. विभागीय सहनिबंधक यांनी दिलेल्या पत्राला जिल्हा बँकेने केराची टोपली दाखवल्याने २० जुलैपासून श्री. मोगल यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

दरम्यान, शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील आमदार आंदोलनस्थळी न फिरकल्याने त्यांचा निषेध नोंदविण्यात आला; तर नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांचे आभार मानले.

"नरहरी झिरवाळ यांच्या आश्‍वासनानंतर सुधाकर मोगल यांचे अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण न्याय मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील." - भगवान बोराडे, शेतकरी समन्वय समिती, राज्याध्यक्ष

After assurance Sudhakar Mughal called off food sacrifice movement nashik news
Nashik Mahavitaran News : महावितरणने थकवले बचत गटाचे पैसे! महिलांची मुख्यमंत्री, उर्जामंत्र्याकडे दाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com