esakal | सुखद वार्ता! "बळीराजा असाच धीर कायम ठेव रे.." लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत घट
sakal

बोलून बातमी शोधा

farmer nashik 1.jpg

लॉकडाउन असल्याने कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी आपली मानसिकता टिकवून ठेवली. कुटुंबाचा सहवासही लाभला. या काळात शासनाने भाजीपाला व फळ विक्री करायला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून दोन पैसे हाती आले.

सुखद वार्ता! "बळीराजा असाच धीर कायम ठेव रे.." लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनेत घट

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : गेल्या वर्षीची तुलनेत या वर्षी लॉकडाउन असताना शेतकरी कुटुंबात रमल्याने नाशिक विभागात शेतकरी आत्महत्येच्या घटनेत घट झाली आहे. मार्च, एप्रिल व मे 2019 मध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये 124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. या वर्षी या तीन महिन्यांत केवळ 52 शेतकऱ्यांनी विभागात आत्महत्या केली असल्याचे शासकीय नोंदीवरून दिसून आले आहे. 

मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी आत्महत्येच्या घटनेत घट 

लॉकडाउन असल्याने कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी आपली मानसिकता टिकवून ठेवली. कुटुंबाचा सहवासही लाभला. या काळात शासनाने भाजीपाला व फळ विक्री करायला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून दोन पैसे हाती आले. यामुळेच मार्च ते मे या तीन महिन्यांत नाशिक विभागातील शेतकरी आत्महत्येची टक्केवारी घटली असल्याचे शासकीय विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची टक्केवारी निम्मी
वर्षाच्या सुरवातीला विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात 24 व फेब्रुवारीत 28 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवेत घेतले. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटी करण्यात आलेला संचारबंदीमुळे लॉकडाउन काळात विभागात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची टक्केवारी निम्मी झाली आहे. पाचही जिल्ह्यांतून मार्च महिन्यात 29, एप्रिल 7, तर मेमध्ये 16, अशा एकूण 52 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2019 मध्ये विभागात या तीन महिन्यांत 124 आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

शेतकऱ्यांचे वाढले आत्मबल 
लोकडाउनमध्ये मार्च ते मेदरम्यान नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात पाच, धुळे 13, जळगाव 18, नंदुरबार 0, तर नगर जिल्ह्यात 16, अशा एकूण 52 आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांचे आत्मबल वाढल्याने आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

चौकट (ग्राफ) 
गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन वर्षांची तुलनात्मक आकडेवारी 
महिना 2019 2020 
मार्च 36 29 
एप्रिल 42 07 
मे 46 16 
---------------------------- 
एकूण 124 52