Nashik News: देवळालीत साकारले पहिले ‘कलापूर्णम तीर्थधाम’! बिनखांबी रंगमंडपाचे सर्वात मोठे जैन देरासर

Crafted Kalapurnam attractive shrine artwork
Crafted Kalapurnam attractive shrine artworkesakal

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : नाशिक ही अगदी प्राचीन काळापासून मंदिरांची भूमी म्हणून प्रसिद्धीस पावले आहे. नाशिकच्या भोवताली केवळ हिंदूच नव्हे तर बुद्ध, पारसी, ख्रिस्ती धर्माबरोबर जैन धर्माची अनेक मंदिरे (देरासरे) आहेत.

नाशिकच्या उजव्या कुशीत अगदी छोट्यामोठ्या डोंगररांगांमध्ये वसलेले देवळाली हे लष्करी तळांमुळे सर्वधर्मीयांना सामावून घेत निर्माण झालेले शहर आहे. (first Kalapurnam Tirthdham established in Devalali Biggest Jain Derasar of Binkhambi Rangmandapa tourism Nashik News)

ब्रिटिशकाळापासून मुंबई स्थित पारशी, जैन, गुजराथी समाजाचे व्यापारी बांधव या परिसरात दिवाळी, ख्रिसमस व उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये येथील स्वतःचे बंगले व आरोग्य धाममध्ये वास्तव्यासाठी येत असतात.

लॅम रोड भागात जैन धर्मीयानी विविध देरासरे साकारली आहे. याच परंपरेत गेल्या सात वर्षांपासून येथे ‘कलापूर्णम तीर्थधाम’ नावाने २४ तीर्थकांराचे ३० हजार चौरस फूट जागेत साकारलेल्या या मंदिरात ८१ बाय ८१ चौरस फुटाचे बिनखांबी रंगमंडप असलेले हे देशातील पहिलेच मंदिर ठरणार आहे.

लॅम रोड भागातच कहाननगर, गौतमस्वामी, शांतीनाथ, महावीर स्वामी, मुनिसुव्रत दादा, श्रीमद् राजचंद्र स्वाध्याय मंदिर, श्रीजी धाम, नंदनवन अशी मंदिरे यापूर्वी साकारलेली आहे. परंतु, यापेक्षा भव्यदिव्य व वेगळे काहीतरी करण्याच्या उद्देशाने याच परंपरेत पुढे जात असताना मुंबईस्थित गुणोपासक परिवार ट्रस्ट यांनी जैन अध्यात्मयोगी संत आचार्य कलापूर्णम सुरीश्वर यांच्या आशीर्वादाने व प्रवचन प्रभावक आचार्यदेव श्री तत्वदर्शन सुरीश्वर महाराज यांच्या प्रेरणेने बालगृह रोडवर तब्बल ६० हजार चौरस फूट जागेमध्ये दोनमजली भव्य दिव्य असे तब्बल १ लाख टनापेक्षा अधिक मकराना संगमरवरी दगडात हे कलापूर्णम तीर्थधाम देरासर साकार होत आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Crafted Kalapurnam attractive shrine artwork
Satyajeet Tambe | माझा विजय हा पदवीधरांच्या सद्सद्विवेकबुद्धीचा विजय : आमदार सत्यजित तांबे

गेल्या सात वर्षांपासून १५० पेक्षा अधिक कारागीर या मंदिर निर्माण कार्यात अव्याहत कार्यरत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य जैन धर्माचे मुलनायक मुनिसुव्रत स्वामी यांची भव्य मूर्ती मुख्य गाभाऱ्यात असणार आहे.

तर ३६० अंशांमध्ये उर्वरित २३ तीर्थकरांचे दर्शन होणार आहे. मंदिराच्या छतावर साकार करण्यात आलेल्या कलाकुसरीत एकही डिझाईन दुसऱ्यांदा वापरण्यात आलेली नाही. त्यासोबत आतदेखील संगमरवरी दगडावर कलाकुसर साकारलेली आहे.

मार्चमध्ये सोहळा

शनी देवतेचे अधिपती म्हणून भगवान मुनिसुव्रत स्वामी हे प्रख्यात आहे. त्यामुळे या कलापूर्णम तीर्थधाममध्ये दर शनिवारी विशिष्ट पूजाविधी केली जाणार आहे. ही पूजाविधी करण्यासाठी येथे देशभरातून भाविक येथे भावी काळात येणार आहे.

या मंदिराचे निर्माण कार्य पूर्णत्वाकडे जात असून, ३ मार्चला रोजी एका विशिष्ट मुहूर्तावर या मंदिरात अंजनशलाका प्रतिष्ठा महामहोत्सव (प्राणप्रतिष्ठा) सोहळा होणार आहे.

यानिमित्त या महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासूनच विविध धार्मिक विधी व विविध प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. देवळालीबरोबर नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणारे हे जैन देरासर ठरणार आहे यात शंका नाही.

Crafted Kalapurnam attractive shrine artwork
Shiv Janmotsav 2023 : निश्चयाचा महामेरु...बहुत जनांसी आधारु! नाशिकरोडला शिवजन्मोत्सव उत्साहात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com