esakal | पॅसेजर रेल्वे होणार आता एक्सप्रेस! तोटा भरुन काढण्यासाठी रेल्वेचे पाऊल.. वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Pune -Manmad Passenger.jpg

पॅसेंजरचे एक्‍सप्रेसमध्ये रुपांतर केल्यानंतर या गाडीचे थांबे, वेग, वेळ यांचे गणित काय असेल याची माहिती रेल्वे मंत्रालयाने मागविली आहे. त्यामुळे 200 किलोमीटर पेक्षा जास्त धावणा-या पॅसेंजर गाड्यांचे एक्‍सप्रेसमध्ये रुपांतराच्या संशोधन व विकास तत्वावरील गाड्यांची पुनर्रचनेमुळे लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा तोटा कमी होण्यास मदत होणार आहे. ​

पॅसेजर रेल्वे होणार आता एक्सप्रेस! तोटा भरुन काढण्यासाठी रेल्वेचे पाऊल.. वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : रेल्वेने 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणा-या पॅसेंजरला एक्‍सप्रेसचा दर्जा दिला जाणार आहे. त्यामुळे पॅसेजरचा वेग वाढून प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पण त्याचवेळी पॅसेंजरच्या प्रवाशांना साधारण तिप्पट जादा भाडे मोजावे लागणार आहे. लॉकडाउनमुळे रेल्वेचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी रेल्वेने हे पाउल उचलले आहे.  

रेल्वेचा तोटा कमी होण्यास मदत

देशातील विविध विभागातील सुमारे 500 पॅसेंजर गाड्यांची यादीच जाहीर केली आहे. रेल्वे सेवा सुरु होताच त्याची अंमलबजावणी होणार असल्याने पूर्वीच्या पॅसेजर रेल्वेगाड्या एक्‍सप्रेस म्हणूनच धावतील. पॅसेंजरचे एक्‍सप्रेसमध्ये रुपांतर केल्यानंतर या गाडीचे थांबे, वेग, वेळ यांचे गणित काय असेल याची माहिती रेल्वे मंत्रालयाने मागविली आहे. त्यामुळे 200 किलोमीटर पेक्षा जास्त धावणा-या पॅसेंजर गाड्यांचे एक्‍सप्रेसमध्ये रुपांतराच्या संशोधन व विकास तत्वावरील गाड्यांची पुनर्रचनेमुळे लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा तोटा कमी होण्यास मदत होणार आहे. 

या पॅसेजर होणार एक्‍सप्रेस 
मध्य रेल्वे भुसावळ-मुंबई, पुणे-कोल्हापूर, पुणे-निजामाबाद, भुसावळ-इटारसी, भुसावळ-नागपूर, भुसावळ-वर्धा, भुसावळ-कटनी, मुंबई- परळी, पुणे-मनमाड, मिरज -हुबळी, मुंबई-पंढरपूर,पंढरपूर-निजामाबाद,देवळाली-भुसावळ यासह देशातील 500 मध्य रेल्वेच्या ३३ पॅसेंजर एक्‍सप्रेस होणार आहेत. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

रेल्वेचे विभाग 
मध्य रेल्वे-33, कोकण रेल्वे-6, ईस्ट कोस्ट रेल्वे-20, ईस्ट-सेंट्रल-12, ईस्टन रेल्वे-30, नार्थ-सेंट्रल-28, नार्थ-ईस्टन-16, नार्थ फ्रंटियर-20,नार्दन रेल्वे-49, नार्थ वेस्ट रेल्वे-52, दक्षिण मध्य-62, पश्‍चिम-मध्य-32, पश्‍चिम रेल्वे-38, दक्षिण पूर्व मध्य-18, दक्षिण पूर्व-20, दक्षिण रेल्वे-34, दक्षिण पश्‍चिम- 38

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण