Nashik News : मतदार नोंदणी जागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

While appealing to support the campaign, Students dressed as Babasaheb Ambedkar and teacher
While appealing to support the campaign, Students dressed as Babasaheb Ambedkar and teacher esakal

Nashik News : शासकीय यंत्रणेमार्फत दरवर्षी विशेष मोहीम राबविली जाते. समाजातील शेवटच्या मतदारांपर्यंत ही मोहीम पोचावी म्हणून जनजागृती करून आवश्यक त्या बाबींची पुर्तता करून घेण्याचा प्रयत्न सतत होतो.

पण दरवर्षी होणाऱ्या मोहिमांमध्ये नागरिकांचा कमी प्रमाणात सहभाग नोंदवला जातो.

ही निराशाजनक बाब असून, त्याकरिता परत मोहीम राबविण्याची गरज भासू लागते.(For voter registration awareness unique activity of students nashik news)

मतदार नोंदणी आणि दुरुस्तीसंदर्भात नागरिकांची अनास्था आणि घरापर्यंत येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या नकारात्मक वागणुकीबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी येथील सुखदेव प्राथमिक विद्यामंदिरातील सातवीचा विद्यार्थी प्रेम वाघमारे आणि अंकित कनोजिया यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा करून ‘नमस्कार मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय’, हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

हे विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात, मतदान अधिकारी घरोघरी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While appealing to support the campaign, Students dressed as Babasaheb Ambedkar and teacher
Nashik 11th Admission : विज्ञान, वाणिज्‍य शाखेत प्रवेशासाठी चुरस..! अकरावी प्रवेशाच्या 10 हजार 427 जागा रिक्‍त

या अनोख्या आवाहनाला नागरिकांचादेखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, हे विशेष.

मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेनुसार वर्गशिक्षिका भारती जाधव, जयश्री मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएलओच्या भूमिकेतील गायत्री नन्हेर, गौरी ढाले, आरशान मण्यार, शुभम तोतके हे विद्यार्थी स्काउट गाइडच्या सहकार्याने यात सहभागी झाले आहेत. संस्थेचे सरचिटणीस संजय काळे आणि परिसरातील नागरिक या उपक्रमाचे कौतुक करत आहेत.

While appealing to support the campaign, Students dressed as Babasaheb Ambedkar and teacher
Nashik Citylinc Bus Strike : तोडगा न निघाल्याने बस डेपोतच; सिटीलिंक करणार वाहक ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com