
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; चिमूकल्यांची सरकारकडे मागणी
कोकणगाव (जि. नाशिक) : आरगडेवस्ती (शिरसगाव ) येथील विद्यार्थ्यांनी कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी या चिमूकल्यांनी 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे', 'माझी भाषा मराठी भाषा, छत्रपतींची भाषा मराठी भाषा' अशा स्वरुपाचे घोषवाक्य पाटीवर लिहून त्यांचे वाचन केले.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी त्याचप्रमाणे
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटिस टिळा
तिच्या संगे जागतील, माय देशातील शिळा
अशा प्रकारे मराठी भाषेच्या सामर्थ्याचे वर्णन करणाऱ्या कवितांचे फलक घेऊन परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक पृथ्वीबाबा शिरसाठ यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यासाठी केलेले प्रयत्न विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितले.
हेही वाचा: मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी
उपशिक्षिका सुनिता दुकळे यांनी मराठी भाषेच्या सध्याच्या स्थितीबाबत खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, इंग्रजी भाषा उत्तम रित्या आपल्याला आली पाहिजे मात्र त्यासोबत खूप मोठा प्रभाव इंग्रजीचा मराठी भाषेवर पडल्याने बरेचसे मराठी प्रतिशब्दांचा लोप होत चालला आहे. त्यामुळे मराठी वाक्यामंध्ये इंग्रजीचा अतिवापर टाळावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे वाचन करुन त्यांचे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शंकर आरगडे यांनीही मराठी भाषेचे महत्व सांगितले. महाराष्ट्रात सर्वदूर मराठीच बोलू असा संकल्प चिमुरड्यांनी करत कार्यक्रमाचा समारोप झाला.
हेही वाचा: मराठी भाषा गौरव दिन विशेष | आमची मराठी, आमची माणसं
Web Title: Give Marathi The Status Of An Elite Language Students Demand To The Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..