Gokul Gite Vs Narendra Darade नाशकात महायुतीचं गणित चुकलं, प्रचार थांबवलेला उमेदवार जिंकला; शिंदेंच्या शिलेदाराला धक्का, काय घडलं?

Gokul Gite Vs Narendra Darade: विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर अपक्ष गोकुळ गिते व प्रसाद हिरे हे उमेदवार रिंगणात होते. गोकुळ गिते यांनी विजय मिळवल्यानं महायुतीला धक्का बसला.
Nashik MLC Election Result

Nashik MLC Election Result Gokul Gite Registers Surprise Victory Over Narendra Darade

Esakal

Updated on

MLC Election Result: महायुतीमधील अंतर्गत कलह, राजकीय मानापमान, उमेदवारी, बंडखोरी, अपक्षांची मनधरणी, तसेच सोशल माध्यमातील राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे नाशिकमध्ये विधान परिषद निवडणूक चांगलीच गाजली. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर अपक्ष गोकुळ गिते व प्रसाद हिरे हे उमेदवार रिंगणात होते. गोकुळ गिते यांनी विजय मिळवलाय तर नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का बसला. गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीचे मंत्री नाशिकमध्ये ठाण मांडून होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या माघारीसाठी मनधरणी सुरू होती. या मनधरणीला यशही आल्याचं महायुतीने सांगितलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com