Nashik News: ग्रामपंचायत सदस्य, कर्मचऱ्याला कोंडले! पाणीटंचाईमुळे निमगाव मढ येथे महिलांचा हंडा मोर्चा

Women and villagers protesting in front of the Gram Panchayat on water shortage issue on Wednesday.
Women and villagers protesting in front of the Gram Panchayat on water shortage issue on Wednesday.esakal

Nashik News : निमगाव मढ गावाला ३८ गाव पाणीपुरवठा योजना आहे. तरीही ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. दहा ते पंधरा दिवसांपासून पाणी न मिळाल्यामुळे महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

महिलांनी हंडे व ढोलताशा वाजवत ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांना जाब विचारत कोंडून घेऊन कुलूप ठोकले, तसेच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मडके फोडत निषेध केला. (Gram Panchayat member employee beaten Handa march of women at Nimgaon Madh due to water shortage Nashik News)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

निमगाव मढला २००९ पासून ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजना कार्यन्वित असताना, थकबाकी वाढल्याने योजनेचा पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

मात्र, १५ दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा न झाल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे बुधवारी (ता. २०) संतप्त महिलांनी ढोलताशांच्या गजरात हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मडके फोडून निषेध केला.

महिलांनी हंडे वाजवून संताप केला. एक तास होऊनही सरपंच व ग्रामसेवक घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी आणखी रोष व्यक्त केला. महिलांनी निमगाव मढसाठी पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली.

दरम्यान, यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात ३८ गाव योजनेची मोठी थकबाकी आहे. ग्रामस्थांकडेही पाणीपट्टीची मोठी रक्कम थकीत असल्याने पैसे भरणे अवघड होत आहे.

Women and villagers protesting in front of the Gram Panchayat on water shortage issue on Wednesday.
Nashik Kumbh Mela: वाराणसीच्या धर्तीवर सिंहस्थाचे नियोजन; सिंहस्थ कमिटीच्या बैठकीत निर्णय

गावात विहिरीला पिण्यायोग्य पाणी आहे, पण याहिरीवरील मोटारीची वीजबिलाची मोठी रक्कम थकीत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.

गावात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे, असे सरपंच वंदना दवंगे यांनी सांगितले. विरोधी गटाचे नेते तथा माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी सांगितले, की ८० लाभधारकांनी पाणीपट्टी आगाऊ भरली आहे.

दर महिन्याला पाणीपुरवठा दुरुस्तीवर १० ते १२ हजार रुपये खर्च केला जातो. मात्र, दुरुस्ती केली जात नाही. सर्व बाबी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र मोरे, माजी सरपंच नवनाथ लभडे, रमेश लभडे, शिवराम लभडे, दत्तू मोरे, पुष्पा केणे, ताराबाई गोसावी, द्रौपदा मोरे, अलका मोरे, लताबाई लभडे, कुसूम दिवटे, सविता खळे, निर्जला क्षीरसागर, सुमन मोरे, मोहिनी लभडे, सुगरा पठाण, जुम्मन पठाण आदी सहभागी झाले होते.

Women and villagers protesting in front of the Gram Panchayat on water shortage issue on Wednesday.
Nashik: चर्चेसाठी बोलावले असताना बंद पाळून वेठीस धरणे बेकायदेशीर; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची येवल्यात माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com