Nashik News : देवळ्यात 1 कोटीचा गुटखा जप्त

Nashik News : देवळ्यात 1 कोटीचा गुटखा जप्त
esakal

देवळा (जि. नाशिक) : देवळा पोलिसांनी शुक्रवारी (ता.१७) रोजी राहूड घाटाचे पायथ्याशी असलेल्या चिंचवे शिवारात ८७ लाख ४६ हजार रुपये किमतीचा गुटखा व

वाहतूक करणारा कंटेनर असा एक कोटी ७ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. (Gutkha worth 1 crore seized from deola nashik news)

तालुक्यातून अवैद्य गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर रात्री उशिरा महामार्गावरुन जाणार असल्याची खात्रीलायक माहिती देवळा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक शहाजी उमप यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक माधुरी कांगणे, अनिकेत भारती व उपविभागीय

पोलिस अधिकारी कविता फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेले गोपणीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, उदय पाठक, प्रशांत पाटील, शरद मोगल, सुभाष चोपडा, योगेश कोळ,

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Nashik News : देवळ्यात 1 कोटीचा गुटखा जप्त
Sugarcane Juice : उन्हाळ्याची चाहूल लागताच रसवंतीगृहांमध्ये घुमतोय घुंगरांचा आवाज!

दत्ता माळी यांनी चिंचवे शिवारात सापळा रचत एका कंटेनर (आरजे १४ जीएल ६१४३) यास थांबवित त्याची तपासणी केली असता त्यांना कंटेनरमध्ये १४७ मोठ्या गोण्या मिळून आल्या. या सर्वांमध्ये गुटखा होता. यानंतर कंटेनर चालक सददाम शहजाद खान (रा. साहबनगर, मथुरा, यूपी) याने गाडीतून उडी मारत पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यास पाठलाग करत पकडले.

यावेळी पोलिसांनी कंटेनर व गुटखा असा सुमारे १ कोटी ७ लाख ४६ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, विनय देवरे, ज्योती गोसावी, सचिन भामरे आदींनी विशेष कामगिरी बजावली .

Nashik News : देवळ्यात 1 कोटीचा गुटखा जप्त
Election 2023 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबल्याने इच्छुकांची कोंडी, खर्चातही वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com