esakal | 'तो' आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ मालेगावचा नाहीच; पोलिस अधीक्षकांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

gandhi market

महिलेच्या छेडछाडचा 'तो' व्हिडिओ मालेगावचा नाही - पो.अधीक्षक

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : शहर व परिसरातील सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक विकृत व्यक्ती बाजारपेठेत कपडे खरेदी करणाऱ्या एका महिलेशी छेडछाड करून आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शहरातील गांधी मार्केट येथील असल्याचे खोडसाळपणे नमूद करण्यात येत आहे. मुळात गांधी मार्केटमध्ये पेव्हर ब्लॉक नाहीत. पोलिसांच्या पडताळणीतही हा आक्षेपार्ह व्हिडिओ शहरातील नसल्याचे दिसून आले आहे, असे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Harassment-of-women-video-not-from-Malegaon-marathi-news-jpd93)

तो व्हिडिओ मालेगावचा नाही : खांडवी

शहरात जाणीवपूर्वक ही क्लीप पसरविण्यात आल्यानंतर पोलिसांनी गांधी मार्केट येथे जाऊन खात्री केली. व्हिडिओ क्लीपमध्ये दिसणारा परिसर हा पूर्ण वेगळा आहे. येथील शांततेला गालबोट लावण्यासाठी कोणीतरी ही व्हिडिओ क्लीप चुकीची माहिती टाकून व्हायरल केली आहे. संबंधित दोषींविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरवासीयांनी अशा अफवांना बळी पडू नये. कुठलाही संदेश खात्री झाल्याशिवाय व सत्यता पडताळल्याशिवाय सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे आवाहन खांडवी यांनी केले आहे.

कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

माजी आमदार आसिफ शेख यांनी गांधी मार्केटमधील व्यापारी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह खांडवी यांची भेट घेऊन दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या मागणीचे निवेदन सादर केले.

हेही वाचा: राज्याचे लक्ष लागलेला 'तो' विवाह सोहळा अखेर रद्द!

हेही वाचा: विकेंडला नाशिककरांची त्र्यंबकेश्वर, अंबोली घाटात मांदियाळी

loading image