Nashik Rain Alert : जिल्ह्याच्या घाटमाथा भागात आज जोरदार पावसाचा अंदाज

Heavy rain forecast in Ghatmatha area of district today nashik news
Heavy rain forecast in Ghatmatha area of district today nashik newsesakal

Nashik Rain Alert : जिल्ह्यातील घाट विभागात काही ठिकाणी शनिवारी (ता. २२) जोरदार पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे.

तसेच, जिल्ह्यात रविवारी (ता. २३) आणि सोमवारी (ता. २५) हलका ते मध्यम, तर मंगळवारी (ता. २५) हलक्या पावसाची शक्यता केंद्राने वर्तवली आहे. (Heavy rain forecast in Ghatmatha area of district today nashik news)

हवामान २६ जुलैपर्यंत ढगाळ राहणार आहे. तापमान कमाल २६ ते २९ आणि किमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. तसेच, वाऱ्याचा वेग तासाला २० ते २५ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, इगतपुरीत चांगल्या पावसाची हजेरी कायम आहे.

आज सकाळी संपलेल्या २४ तासांत इगतपुरी मंडलात ६१, घोटीत १७, धारगाव ३६, पेठ २३.८, जोगमोडी २३.८, त्र्यंबकेश्‍वर २५, वेळुंजे २७.५, हरसूलमध्ये ३१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय, नांदगाव मंडलात १४, बाऱ्हे १४.५, मनखेड १०.५, ननाशी ३२.८, कोशिंबेमध्ये १३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात ९७ टक्के कमी पाऊस

जिल्ह्यात गेल्या वर्षी २१ जुलैपर्यंत १५८.६ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत त्या तुलनेत ९७.४ टक्के कमी म्हणजेच, ६१.२ टक्के पाऊस झाला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत इगतपुरी तालुक्यात २२.४, पेठमध्ये १६, तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये २८.१ मिलिमीटर पाऊस झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Heavy rain forecast in Ghatmatha area of district today nashik news
Kolhapur Rain : 'पंचगंगा' इशारा पातळी गाठणार! राधानगरीत 5.95 TMC तर 'या' 14 धरणांत किती आहे साठा? जाणून घ्या..

देवळ्याचा अपवाद वगळता इतर तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस झाला. सर्वदूर अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याने धरणातील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी कमी म्हणजे ३६ टक्के झाला आहे. गेल्या वर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे भरलेली होती.

सध्या आळंदीमध्ये १०, वाघाडमध्ये २१, ओझरखेडमध्ये २६, तिसगावमध्ये शून्य, भावलीत ८३, वालदेवीमध्ये २३, भोजापूरमध्ये १०, हरणबारीमध्ये ६४, केळझरमध्ये ४८ टक्के जलसाठा झाला आहे. इतर धरणांमधील आताच्या जलसाठ्याची टक्केवारी अशी : गंगापूर- ४५, कश्‍यपी- २५, गौतमी गोदावरी- २३, पालखेड- ३६, करंजवण- २७, पुणेगाव- २५, दारणा- ७२, मुकणे- ५४, कडवा- ३०, नांदूरमधमेश्‍वर- ५७, चणकापूर- ४५, गिरणा-२०, पुणंद- ५०.

Heavy rain forecast in Ghatmatha area of district today nashik news
Rain Update Maharashtra: पुढचे ४८ तास कोकणासाठी धोक्याचे, 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com