Citizens who participated in the Hindu Jan Akrosh Morcha
Citizens who participated in the Hindu Jan Akrosh Morchaesakal

Hindu Jan Akrosh Morcha : भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त करा; नीतेश राणेंचे प्रशासनाला आवाहन

Hindu Jan Akrosh Morcha : महाविकास आघाडी सरकार असताना राज्यात हिंदू मोर्चे काढण्याची कोणाची ताकद नव्हती. केंद्रात व राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे.

देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचे पालन केले पाहिजे. (hindu jan akrosh morcha Nitesh Rane appeal to administration to free Bhuikot fort encroachment nashik news)

मालेगावच्या भुईकोट किल्ल्याचा अतिक्रमणामुळे श्‍वास गुदमरला आहे. आयुक्तांनी अतिक्रमण तत्काळ काढावे असे आवाहन भाजप आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. मालेगावातील गोरक्षकांवर होत असलेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

येथील सखल हिंदू समाजातर्फे रविवारी (ता.२) जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. रामसेतू पुलावरुन निघालेल्या मोर्चाचे मसगा कॉलेज स्टॉपसमोर सभेत रूपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. सुभाष भामरे, नेहा पटेल (गुजरात), मिलिंद एकबोटे, मंजुषा कजवाडकर, मच्छिंद्र शिर्के, संजय शर्मा आदी उपस्थित होते.

दुपारी साडेअकराला मोर्चास सुरुवात झाली. नागरिकांनी जय श्रीराम, धर्मांतर बंदी कायदा लागू झालाच पाहिजे, जयस्तु हिंदु राष्ट्रम, गोरक्षकावर भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध, लव जिहादावर कडक कायदा करावा. गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त करावा यासह विविध घोषणा दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citizens who participated in the Hindu Jan Akrosh Morcha
Nashik News : बांधकाम विभागापेक्षा ग्रामपंचायत बरी! देयकांसाठी हवेत 1076 कोटी, दिलेत फक्त 'इतके' कोटी

संगमेश्‍वरातून मोसम चौक, कॅम्प रोड, एकात्मता चौक या मार्गावरुन मोर्चा कॉलेज स्टॉपवर आल्यानंतर येथे पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

आमदार नीतेश राणे म्हणाले, की मसगा महाविद्यालय प्रकरणातील अनिस कुट्टी अजून फरार आहे. त्याला पोलिसांनी तीन दिवसात अटक करावी अन्यथा आम्ही त्याचा शोध घेऊ. भुईकोट किल्ल्यातील झोपडपट्टी काढण्यासाठी आयुक्तांनी तातडीने कारवाई करावी. मालेगावला गोरक्षकांवर हल्ले केले जातात. पोलिस प्रशासनाने हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

मिलिंद एकबोटे यांनी मसगा महाविद्यालयात हिंदू मुलांना कलमा पढवण्याचा प्रकार घडला. मोदी सरकारने काश्‍मीरमध्ये बंदूकधाऱ्या युवकांच्या हातात लॅपटॉप दिले. येथे संख्याबळाच्या जिवावर कोणी दादागिरी करू नये असे सांगितले. यावेळी नेहा पटेल यांनी गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. हनुमान चालिसा पठण करत कार्यक्रमाची सांगता केली.

आमदार राणे यांनी भुईकोट किल्ल्यासह येथील विविध प्रश्‍नांचे निवेदन अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती व सहाय्यक उपअधिक्षक तेगबीरसिंह संधू यांना सादर केले. मोर्चात भाजप, शिवसेना, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते.

Citizens who participated in the Hindu Jan Akrosh Morcha
Chhagan Bhujbal : कट्टर विरोधक बनले एकाच सरकारचे घटक; आता जुळवून घेण्याची वेळ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com