esakal | हिंदू-मुस्लिम बंधुभाव जोपासत 'शिवजयंती'! सलग १९ वे वर्ष 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (45).jpg

शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य हे देशातील पहिले धर्मनिरपेक्ष राज्य आहे. महाराजांनी सर्वच धर्मग्रंथ व प्रार्थनास्थळांना सारखेच महत्त्व दिले. ते खऱ्या अर्थाने सहिष्णू राजे होते. त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांचा आदर केला. सर्वांना समानतेचीच वागणूक दिली. 

हिंदू-मुस्लिम बंधुभाव जोपासत 'शिवजयंती'! सलग १९ वे वर्ष 

sakal_logo
By
रोशन खैरनार

सटाणा (जि.नाशिक) : अंजुमन फरोगे तालीम शिक्षण संस्था संचालित बागलाण ऊर्दू हायस्कूलतर्फे हिंदू-मुस्लिम बंधुभाव जोपासत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (ता. १९) साजरी करण्यात आली. संस्थेतर्फे शिवजयंतीचे हे सलग १९ वे वर्ष आहे. 

शिवजयंतीचे सलग १९ वे वर्ष 

राजेंद्र पवार म्हणाले, की शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य हे देशातील पहिले धर्मनिरपेक्ष राज्य आहे. महाराजांनी सर्वच धर्मग्रंथ व प्रार्थनास्थळांना सारखेच महत्त्व दिले. ते खऱ्या अर्थाने सहिष्णू राजे होते. त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांचा आदर केला. सर्वांना समानतेचीच वागणूक दिली. 
हल्ली शिवरायांसारख्या महापुरुषांचे नाव काही समूह फक्त राजकारणासाठी वापरत असून, त्यांनी रयतेच्या राज्याचे स्मरण ठेवत राज्य चालविल्यास नवा भारत घडू शकतो, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. महाराजांविषयी अनेक गोष्टी उजेडात आलेल्या नसल्याने त्यांच्यावर आणखी संशोधन होणे गरजेचे असल्याचे माजी आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले. ऊर्दू शाळेचा शिवजयंती कार्यक्रम मर्यादित असला तरी त्यातून व्यापक संदेश देण्याचे काम संस्थेतर्फे सुरू असल्याचे फईम शेख यांनी सांगितले. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

महाराजांच्या जीवनावर भाषण
अक्सा ॲन्ड ग्रुपच्या विद्यार्थिनींनी आयतपठण केले. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. अनम मिर्झा व लायबा तांबोळी या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर भाषण केले. कार्यक्रमास सादीक इमाम, भाऊसाहेब भामरे, किशोर ह्याळीज, अशोक वसईकर, नवल पाटील, जावेद तांबोळी, जगन सोनवणे, रत्नाकर सोनवणे, वसंत पगार, अमोल बच्छाव, बापू अमृतकार, आबा बागड, डॉ. युवराज खरे आदींसह मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. मुख्याध्यापक इम्तियाज अन्सारी व नौशिन शेख यांनी सूत्रसंचालन केले. आरिफ मुसा यांनी आभार मानले.  

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार संजय चव्हाण, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, संस्थेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते फईम शेख, हाजी मन्सुरी, हाजी इक्बाल मुहम्मद शेख, आसिफ शेख, आरीफ मन्सुरी आदी प्रमुख पाहुणे होते. 

loading image