Nashik News: वणीत आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र! आदिवासी भागातील आजारांवर होणार संशोधन

Adarsh ​​Rural Health Research Center in Trauma Care Building of Vani Rural Hospital.
Adarsh ​​Rural Health Research Center in Trauma Care Building of Vani Rural Hospital.esakal

Nashik News : येथील ग्रामीण रुग्णालयात आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली.

लवकरच संशोधन केंद्र कार्यान्वीत होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील आजारांवरील संशोधनाला वेग मिळणार आहे. (ideal ​​Rural Health Research Center in vani Research will be conducted on diseases in tribal areas Nashik News)

केंद्र सरकाच्या आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘आरोग्य संशोधनाच्या प्रोत्साहनासाठी पायाभूत सुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यात दुसरे व नाशिक जिल्ह्यात एकमेव वणी येथे आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी ७ कोटींची तरतूद केली आहे.

या केंद्रासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यासाठी दीड कोटी रुपये सरकारने या संस्थेला दिले आहेत. संशोधन केंद्र वणी ग्रामिण रुग्णालयातील जुन्या कर्मचारी निवासगृहाच्या जागेत बांधण्याचे प्रस्तावित आहे.

मात्र, प्रशासनाने ट्रॉमा केअरच्या इमारतीत आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला व या इमारतीत राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्थेने संशोधन केंद्रासाठी आवश्यक सर्व भौतिक, तांत्रिक सुविधांची पूर्तता केली असून लवकरच युनिट कार्यान्वित होणार आहे.

ग्रामीण जनतेला आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी व तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, नवीन तंत्रज्ञान विकसक तयार करणेे, हा प्रमुख उद्देशाने संशोधन केंद्रात एकूण ८ संशोधन टीम कार्यरत राहणार असून, यात वैद्यकीय संशोधनासाठी आवश्यक उपकरणांबरोबरच सोनाेग्राफी, इसीजीसारखे वेगवेगळे उपकरणे असतील.

यातून आदिवासी भागातील लोकांच्या आजारांवर संशोधन करण्यासाठी आयसीएमआर अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार असून, उपचार केंद्र आणि संशोधन केंद्राची सोय केली जाईल.

धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधन केंद्रात सहभाग घेणार आहेत. हे युनिटशेजारील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांतही संशोधनामार्फत सेवा देणार आहे.

Adarsh ​​Rural Health Research Center in Trauma Care Building of Vani Rural Hospital.
Nashik News: धान्यवाटप, गाळेविक्री प्रकरणी पिंगळेंना क्लीन चिट! मुख्यमंत्र्यांनी काढलेला आदेश कोर्टाकडून रद्द

आयसीएमआर-राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्थेचे उपसंचालक व शास्त्रज्ञ डॉ. राहुल गजभिये या प्रकल्पासाठी नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहात आहेत. राज्य शासनातर्फे डॉ. कपिल आहेर, डॉ. सारीका पाटील यांचीही नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

हे संशोधन प्रकल्प राबविले जाणार

-सर्पदंश प्रतिबंध व उपचार

-सिकलसेल ॲनिमिया

-गुंतागुंतीच्या प्रसूती

-कीटकनाशक विषबाधा

-अपघाताचे संशोधन

-बाल आणि माता मृत्यू

Adarsh ​​Rural Health Research Center in Trauma Care Building of Vani Rural Hospital.
Nashik Shivsena News: वाहतुक समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार! आॉनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून जनसहभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com