In order for heavy rain to fall students of Primary School did rain coming tradition nashik news
In order for heavy rain to fall students of Primary School did rain coming tradition nashik newsesakal

Nashik Rain Tradition : धोंडी-धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे'चा गोराणेत टाळ, मृदंगच्या तालावर गजर

Nashik Rain Tradition : जुन्या पारंपारिक पध्दतीने आजही पावसासाठी वरूणदेवाला साकडे घालण्यासाठी 'धोंडी-धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे'चा गजर कायम दिसू येत आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शेतकऱ्यांच्या लेकरांनी रुसलेल्या वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी टाळ, मृदंगच्या तालावर धोंड्याचे रूप धारण करून 'आता बरसून रान भिजवून टाक रे देवा' अशी आर्त हाक घालत आहेत. (In order for heavy rain to fall students of Primary School did rain coming tradition nashik news)

गोराणे (ता.बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांकडून विविध उपक्रम राबवित चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहित केले जात आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत सर्वाधिक शेतक-यांचीच मुले असल्याने कुटुंबियांची शेतीव्यवसायात उपजीविका चालते. यावर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही पावसाने दडी मारली आहे.

यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुतांश भागात शेतक-यांची पेरणी झाली असून बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे गहिरे संकट ओढावण्याची चिन्ह दिसत आहेत. परिसरात जोरदार पाऊस बरसावा यासाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी गावातून टाळ, मृदंगचा ठेका धरत 'धोंडी-धोंडी पाणी दे'चा गजर केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

In order for heavy rain to fall students of Primary School did rain coming tradition nashik news
Success Story : यशाची हॅट्‌ट्रिक करत अखेर स्वप्नील पवार झाले ‘आयएएस’

दरम्यान टाळ, मृदंगच्या तालावर शिक्षकही थिरकले होते. शालेय विद्यार्थ्यांनी पावसासाठी दिंडी गल्लीबोळातून थेट राम मंदिरात पोहचले 'आता तरी जोरदार पाऊस बरसू दे रे देवा, अन् शेतक-यांच रान भिजवून टाक' असे साकडे घालत होते.

प्रमोद आहिरे या विद्यार्थ्याने धोंड्याची भूमिका बजावली राम मंदिरात सर्वच विद्यार्थ्यांनी दर्शन घेत पाऊस पडावा यासाठी प्रार्थना केली. दिंडीत शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गायकवाड, शिक्षक सोमनाथ कापडणीस, भरत कापडणीस, किरण अहिरे, संदीप निकम यांनीही सहभाग घेतला होता.

"गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊस नाही. पावसाचे वातावरण आहे. पण पाऊस कोसळत नसल्याची वस्तूस्थिती आहे. शेती शिवारातील पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. वाढ खुंटली आहे. कडधान्ये पिकांचा हंगाम वाया गेला आहे. कापूस, मका, ज्वारी, बाजरी तग धरुन उभी आहेत. जोरदार पावसाची नितांत गरज आहे. चिमुकल्यांनी वरूणराजाला दिलेली आर्तहाक प्रेरणादायक आहे." -दिनेश देसले, सरपंच गोराणे.

In order for heavy rain to fall students of Primary School did rain coming tradition nashik news
Nashik Rain Update : इगतपुरीत वरुणराजाची आबादानी; 48 तासात 128 मिलीमीटर पावसाची नोंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com